शाहू साखर कारखान्यामार्फत शुक्रवार दि. १६ ते १९ सप्टेंबर या दरम्यान मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन
schedule11 Sep 22 person by visibility 263 categoryक्रीडा
राजे समरजितसिंह घाटगे यांची माहिती :स्पर्धेचे सलग ३६ वे वर्ष
कागल, प्रतिनिधी.
येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत शुक्रवार दि,१६ ते सोमवार दि.१९ सप्टेंबर या दरम्यान मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे.राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त दरवर्षी या स्पर्धा घेतल्या जातात . स्पर्धेचे हे ३६ वे वर्ष आहे.अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या कुस्ती स्पर्धा विविध ३१ गटांमध्ये होणार आहेत. त्यामध्ये १४ वर्षाखालील बाल व १६ वर्षाखालील कुमार गटामध्ये प्रत्येकी आठ गट तसेच १९ वर्षाखालील ज्युनियर व सीनियर प्रत्येकी सात वजनी गटामध्ये या स्पर्धा होतील.तसेच महिला कुस्तीगिरांसाठी ४५,५५ व ६५ किलो अशा तीन वजनी गटांमध्ये स्पर्धा घेण्यात येतील. स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना कुस्ती पूर्ण होताच रोख रक्कम,प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
कारखाना कार्यक्षेत्र,कागल तालुका,गडहिंग्लज शहर,उत्तूर,कडगांव- कौलगे जिल्हा परिषद मर्यादित या स्पर्धा होतील.असेही त्यांनी पत्रकात म्हंटले आहे.
कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून उद्योन्मुख खेळाडूंना संधी मिळावी. या हेतूने १९८४ पासुन राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त या कुस्ती स्पर्धा संपूर्ण ऑलिम्पिक पद्धतीने नियोजन करून भरवल्या जातात. दोन वर्षे कोरोना व महापूरामुळे सर्व स्पर्धा ठप्प होत्या. त्यामुळे मल्लांसह खेळाडूंचे नुकसान न होता प्रोत्साहन मिळावे व इतरांनीही अशा स्पर्धांसाठी पुढाकार घ्यावा यासाठी गतवर्षी बंदिस्त गोदामात ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन केले होते. कुस्ती शौकिनांना स्पर्धेचा आनंद घेता यावा. यासाठी फेसबुक पेजवरून ऑनलाइन प्रक्षेपण केले होते.
साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगें यांनी चालविला आणि लोप पावत आलेली कुस्ती भरभराटीस आली. ख-या अर्थाने कोल्हापूर जिल्ह्यात कुस्ती कला जिवंत ठेवण्यासाठी स्व. राजेंचे फार मोठे योगदान आहे.स्व. राजेसाहेबांच्या निधनानंतर हाच वसा आणि वारसा पुढे चालविण्याचे काम राजे समरजितसिंह घाटगे करीत आहेत. समरजितराजेंनी अल्पावधीतच कारखान्याबरोबरच क्रीडा क्षेत्राचा नावलौकीक वाढविला आहे.स्व. राजेंनी कारखाना कार्यक्षेत्र व कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र क्रीडा विभाग सुरू केला. समरजितराजेंनी तो सुरू ठेवला आहे.