+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शन संघटनेच्या वतीने १४ जून रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन adjustसेनापती कापशीतील ५६६ घरकुलांना तातडीने प्रॉपर्टी कार्ड द्या* adjustशक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती* adjustपरदेश शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी 12 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत adjustनिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालतीचे आयोजन adjustडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पार्थ पाटीलला* *ब्रिटिश विद्यापीठाकडून 100% शिष्यवृत्ती* adjustरिमझिम गिरे सावन....' ने कार्यक्रमाची उंची वाढवली adjustडी वाय पाटील अभियांत्रिकीचा* *इगलट्रोनिक्स एव्हिएशन सोबत सामजस्य करार adjustडॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी महावि‌द्यालयात विविध शिष्यवृत्ती योजना जाहीर adjustआवड आणि क्षमता लक्षात घेऊन योग्य करिअर निवडा*
schedule15 Mar 23 person by visibility 153 category
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक मध्ये घाटगे पाटील इंडस्ट्रीज कंपनीच्या पुल कॅम्पस इंटरव्यू उत्साहात झाल्या.

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने या पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते.या पूल कॅम्पस ड्राईव्ह मध्ये डी वाय पाटील पॉलिटेक्निक बरोबरच डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस आणि पॉलिटेक्निक तळसंदे , के पी पाटील पॉलिटेक्निक मुदाळ येथील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

 यावेळी बोलताना डॉ.डी. वाय पाटील पॉलिटेक्निक प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी सांगितले की,सध्या अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसमोर नोकरीच्या चांगल्या संधी आहेत. या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी पॉलिटेक्निकच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. घाटगे पाटील सारख्या नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना या निमित्ताने मिळणार आहे. 

 यावेळी कंपनीचे असिस्टंट एचआर विनायक भारती यांनी सांगितले की , घाटगे पाटील कंपनीमध्ये नव- नवीन संकल्पना राबवून चांगले मनुष्यबळ विकसित करण्यात येत आहेत. योग्य गरजू उमेदवारांना नोकरी देण्यात येणार आहे .

 यावेळी उपप्राचार्य एम .पी पाटील, घाटगे पाटील चे असिस्टंट एचआर विकास सावंत, प्रा. सुदर्शन साळोखे, प्रा. महेश रेणके ,प्रा. अक्षय करपे, प्रा. बी जी. शिंदे ,असिस्टंट रजिस्ट्रार सचिन जडगे उपस्थित होते.
 प्रास्ताविक ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. नितीन माळी यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा.धैर्यशील नाईक यांनी केले.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी.पाटील,उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, ट्रस्टी आ. ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.ए.के.गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.