गोकुळ अध्यक्ष पदाचा विश्वास पाटील देणार राजीनामा ?
schedule10 May 23 person by visibility 825 categoryराजकीय

कोल्हापूर आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील अध्यक्षपदाचा राजीनामा देणार काय ? ठरल्याप्रमाणे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांची अध्यक्षपदी निवड होणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
गोकुळ दूध संघाचे लेखा परीक्षण सुरू असले
तरी अध्यक्ष निवडीवर त्याचा कोणताही परिणाम नाही असेही काही संचालकांनी सांगितले. 'विश्वास पाटील हे राजीनामा देणार आहेत, मुदत संपत असल्याने राजीनामा देण्यासाठी त्यांचे कोणतेही आडकाटी नसल्याची चर्चा संचालकांच्यामध्ये आहे. नेते सांगतील त्यावेळी माझी निवड होईल असेही ज्येष्ठ संचालक डोंगळे यांनी सांगितले.
आ. हसन मुश्रीफ यांनी 14 मे 2021 रोजी विश्वास पाटील यांची निवड झाली; त्यावेळी विश्वास पाटील 10 मे 2023 ला राजीनामा देतील असे सांगितले होते.10 मे उजाडला तरी याबाबत अध्यक्षपदाचा राजीनामा नसल्याने गोकुळ संचालकांच्या मध्ये शांतता पसरली आहे.
याबाबत अध्यक्ष विश्वास पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता आपण बाहेर आहोत असे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.
येत्या चार दिवसात नेत्यांच्या समवेत बैठक होणार असून याबाबत लवकरच चेअरमन निवडीबाबत चर्चा होणार आहे.