+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustशाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करा adjustशेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी शाहू महाराजच खासदार आवश्यक : आ. पी. एन. पाटील adjustसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ? : संभाजीराजे छत्रपती adjustसंजय मंडलिक विधानसभेला मुश्रीफ की समरजितराजे सोबत राहणार ? adjust गडहिंग्लज एमआयडीसीसाठी प्रयत्नशील राहू adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये* *फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी* adjustमहाराज जरा लक्ष ठेवा, नाहीतर वटमुखत्यार वाड्यावर नाव लावतील adjustचेतन’ यांचे व्हीजन घेऊनच कोल्हापूरचा विकास करणार ; शाहू छत्रपती adjustपोर्ले येथे सभेत सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन adjustगद्दार खासदाराला कायमचे घरी बसवा
schedule15 Sep 23 person by visibility 345 categoryलाइफस्टाइल
कोल्हापूर आवाज इंडिया
     
      राजारामपुरी येथील सहाव्या गल्लीतील तांत्रिक देखाव्यासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळ यांनी यंदाही आपले वेगळेपण जपत बालाजी अवतार हा हलता भव्य तांत्रिक देखावा साकार केला आहे गेली आठ दिवस सदर देखावा जोडण्याचे काम अहोरात्र सुरू आहे देखाव्यामध्ये भगू ऋषी नारद शंकर-पार्वती ब्रह्मा सरस्वती विष्णू लक्ष्मी यांच्या हालत्या भव्य मुर्त्या आहेत तर गुराखी व गाय ही देखील हुबेहूब बनवली आहे देखाव्याचे मुख्य आकर्षण हे जमिनीपासून 17 फूट उंच भव्य हालती बालाजीची मूर्ती जी २० फुटाचे वारुळ फोडून बाहेर येणार आहे असा हा देखावा सहा मिनिटाचा असून बहुतांशी हालचाली हायड्रोलिक पंपावर होणार असून आत्तापासूनच गल्लीमध्ये देखाव्याचे जोडकाम पाहण्यास गर्दी होत आहे.लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत यादेखाव्याचे आकर्षण आहे 15 तंत्रज्ञ व मंडळाचे कार्यकर्ते सदर देखाव्याचे काम करत आहेत चालू वर्षी आज पर्यंतचा सर्व गर्दीचा उच्चांक मोडला जाईल असे मंडळाचे कार्याध्यक्ष धनराज माने व अध्यक्ष योगेश कुलकर्णी यांनी सांगितले आजपर्यंत राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळाने विविध सामाजिक प्रश्नावर प्रकाशझोत टाकणारे देखावे सादर केले आहेत याबद्दल विविध पुरस्काराने मंडळाला गौरवण्यात आले आहे.