Awaj India
Register
Breaking : bolt
रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ*डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सर्वसाधारण विजेतेपद*लोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय :आमदार सतेज पाटील आनदराव पाटील चुयेकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९७%नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्केडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल ९९.१७ टक्के*मित्र-मैत्रिण नाते किती ग्रेट?निवडणुकीनंतर लाडकी बहीण राज्य सरकारला सावत्र झाली; आमदार सतेज पाटील यांची टिका...शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज ; अरुण डोंगळेशालेय आयडी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : प्रवीणभाई माणगावे

जाहिरात

 

कशी करावी बचत ?*

schedule30 Oct 22 person by visibility 280 categoryउद्योग

*जागतिक बचत दिन*
प्रा. डॉ. सौ. स्मिता गिरी

*जागतिक बचत दिन अर्थात काटकसर दिन*
जीवनाचे खरे व्यवस्थापन हे *मन आणि आर्थिक परिस्थिती* याच्या सुसंगत व्यवस्थापनावर अवलंबून आहे.
सुसंगत व्यवस्थापन करत असताना मिळकत आणि गरज याची योग्य सांगड घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
भारतामध्ये अजूनही खेड्यांमध्ये अशा व्यवस्थापनावर एकत्र कुटुंब पद्धती खरा प्रभाव निर्माण करतात.
या उलट आभासी शहरी एकल कुटुंब यांचे व्यवस्थापन हे मानसिक दुर्बलता आणि आर्थिक ओढाताण याने व्यापलेले आहे.

मानवी स्वभाव म्हणजे हातात पैसा आला की, तो खर्च झालाच म्हणून समजा. गरजेपेक्षा हौस महत्त्वाची ठरत असली, तरी भविष्याचे नियोजनही तेवढेच महत्त्वाचे ठरते. गरजेला महत्त्व देतानाही काटकसर करण्याकडे मात्र दुर्लक्ष नकोच नको. अनेकजण काटकसरीला कदाचित 'कंजूषपणा' असे बिरूद लावतील; पण हा 'कंजूषपणा' म्हणजे खर्चाला 'काट' देत केलेली एकप्रकारची कमाईच आहे.

इंग्रजीत एक म्हण आहे, *मनी सेव्ह इज मनी अर्नड्‌'*. 
काटकसरीची कसरत स्वयंपाकघरापासून करत वीज आणि इंधन बचतीची प्रवृत्ती विकासाकडे घेऊन जाणारी आहे. अर्थात्‌ काटकसरीचा गुण महिलांमध्ये जन्मजातच असतो. म्हणून 'किचन किंग' म्हणून महिलांची ओळख आजही कायम आहे. 
देशाच्या प्रगतीत नागरिकांचेही सक्षमीकरण लपले आहे. हाच धागा पकडून इटलीमध्ये ३० ऑक्‍टोबर १९२४ साली आंतरराष्ट्रीय बचत बॅंकेची स्थापना करण्यात आली. कार्यक्रम सुरू असताना एका इटालियन प्रोफेसरकडून कार्यक्रमाच्या शेवटी *"३० ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय बचत दिन"* घोषित केला. तेव्हापासून जागतिक बचत दिन अर्थात्‌ काटकसर दिन पाळला जातो. 
काटकसरीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्याला मदत मिळते, हा मुख्य हेतू यामागे होता. 

खर्चाचे नियोजन न करता मनमौजीपणे पैसा उधळल्यास हातात 'शून्य' उरते. बचतीऐवजी उसणवारीवर जगण्याची वेळ येते. यातूनच सावकारी पद्धत पुढे येते. केवळ पैशाचीच नव्हे; तर वीज, पाणी, इंधन बचत करून काटकसर दिन साजरा करावा, अशी अपेक्षा डॉ. तारकेश्‍वर गोडघाटे यांनी व्यक्त केली.
बचतगटांची क्रांती काटकसर दिनाचे प्रतीक अलीकडे खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्यात. आकर्षक राहणीमान तसेच मॉलसंस्कृती आल्यापासून खरेदीला उधाण आले. जी वस्तू बाहेर दोनशे रुपयाला मिळते, ती वस्तू तिथे चारशे रुपयाला मिळते. मग काटकसर कशी होईल. जिथे दोन पैसे वाचावे असे वाटते, तिथे अधिकचे पैसे खर्च होतात.

 अशावेळी महिलांनी निर्माण केलेले बचतगटासारखे पर्याय पुढे आले आहेत. हे बचतगटही महिलांनीच तयार केले असून, उपराजधानीत आजघडीला चार हजारांवर बचतगट आहेत. यामुळे कुटुंब आर्थिक सक्षम होतेच पण घरातील प्रत्येक छोटी मोठी व्यक्ती कार्यात गुंतली जाऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. याचा परिणाम देश आर्थिक पुढारला जातो. तरुण आणि म्हातारे व्यक्तीही कार्यशील राहतात. आर्थिक सबलता यातून वाढीस लागते.

*कशी करावी बचत ?*
वेतनातील पाच टक्के रक्कम बँकेत जमा करावी. 
बचतगट, पोस्टात आवर्त ठेव गुंतवणूक करावी. 
सौरऊर्जेतून आणि कामापुरताच वीजेचा वापर करावा. 
कमी अंतरासाठी सायकलचा वापर करावा. 
भूखंड, सोने खरेदीतून बचत करावी.

*काय करू नये* :
विनाकारण खर्च, प्रवास, परदेश प्रवास टाळावा. 
छोट्या-छोट्या कारणासाठी मोटार काढू नये. 
वाहनाचा वेग नियंत्रित केल्यास इंधनाची ही बचत होते. 
उगाच विद्युत उपकरणे सुरू ठेवू नये.
गरज नसताना इतरांच्या कार्यात ढवळा ढवळ करू नये.
Eco-friendly वस्तूंचा प्रसार करावा.
मानवी घड्याळ ज्याचे त्याने योग्य प्रकारे आहार, विहार, विचार याने सुरळीत ठेवावे.
पूर्व काळजी आणि आयुर्वेद याचा आधार घ्यावा.
योग्य आवड ओळखून कला आत्मसात करून त्याचा जीवनात वापर करावा.
सुसूत्रता, नियमितपणा आणि सातत्य हे सुखी जीवनाचे गमक आहे हे विसरू नये.
शेवटी आयुष्य किती वर्ष जगलात यापेक्षा ते कसे जागलात हे जास्त महत्वाचे ठरते.
माती, पाणी, हवा, ऊर्जा आणि अवकाश पोकळी यांची काटकसर ही संपूर्ण विश्व पुनर्रचना निर्मितीचा पाया आहे आणि हेच मानवी जीवनाचे गमक आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes