असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर 06 ऑगस्ट 2022
लोकशाहीमध्ये विकासकामांना गती मिळण्यासाठी मंत्रिमंडळ असणे महत्वाचे आहे.नवीन सरकारमधील लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार हा राज्याच्या विकासाला मारक आहे,अशी टीका माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे मंत्र्यांकडील काही अधिकार हे त्या त्या खात्याच्या सचिवांना देण्यात आले आहेत.नुकताच हा निर्णय झाला.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असे दोघांचेच सरकार सुमारे 35 दिवसांपासून काम करत आहे.यावर बोलताना ते म्हणाले की,शिंदे - फडणवीस सरकारला 40 मंत्री अजून ठरवता येत नाहीत आणि हे सरकार कसे चालवू शकतील ?मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे याचा फटका विकासकामांना बसत आहे.केवळ अधिकाऱ्यांच्या भरोशावर कामकाज करणे योग्य आहे का?
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान -
काँग्रेस पक्षातर्फे हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे.यासह विविध कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.यावेळी पक्षातर्फे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे,असे सतेज पाटील म्हणाले .