Awaj India
Register
Breaking : bolt
लोककलांतून उलगडला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपटजुन्याप्रमाणे संच मान्यता चालू ठेवली नाही तर ; गुलाम शिक्षण पद्धतीतून निर्माण होतीलवसा पारंपारिक लोक संस्कृतीचा'" या कार्यक्रमाचे आयोजनसाळोखेनगर डी. वाय.पी.मध्ये रक्तदान शिबिर संपन्नराज्य राखीव पोलीस वर्धापन दिनानिमित्त संचलन परेड सोहळा उत्साहात*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राज निकमची* *बल्गेरिया येथे रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड*महिलांनी अन्यायाविरुद्ध लढावे अन्याय करू नये; अनुराधा भोसलेकल्पना मंथन देसाई यांना आदर्श महिला पुरस्कारजयश्री अशोक कुरबेट्टी यांना आदर्श महिला पुरस्कारमनाली सुनील मंडालकर यांना आदर्श महिला पुरस्कार

जाहिरात

 

आदर्श व्यवस्थापन व उत्तम गुणवत्ता म्हणजेच ‘गोकुळ’

schedule16 Jul 24 person by visibility 203 category


आदर्श व्यवस्थापन व उत्तम गुणवत्ता म्हणजेच ‘गोकुळ’  

‘गोकुळ’ देशातील एक आदर्श सहकारी संस्था

                                                            - डॉ.महेश कदम

                                                          विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर

कोल्हापूर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था डॉ.महेश कदम यांचा गोकुळतर्फे सत्कार

 

कोल्हापूर ता.१६: गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये डॉ.महेश कदम यांची विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर, विभाग (कोल्हापूर,सांगली,सातारा) या पदावरती पदोन्नती झालेबद्द्ल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्‍या हस्‍ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रधान कार्यालय,गोकुळ शिरगाव येथे सत्कार करण्‍यात आला.

          सत्‍कारावेळी बोलताना डॉ.महेश कदम म्हणाले की, आदर्श व्यवस्थापन व उत्तम गुणवत्ता म्हणजेच गोकुळ असून गोकुळचा उल्लेख देशभरात सहकारातील एक आदर्श संस्था म्हणून आवर्जून केला जातो. गोकुळ मधील दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यामध्ये चांगला समन्वय असून प्रत्येकाला गोकुळ ही आपली संस्था आहे, अशी भावना याठिकाणी पाहायला मिळत असल्यामुळेच आज गोकुळ प्रगती पथावर आहे. उपनिबंधक (दुग्ध) या पदावर कार्यरत असताना गोकुळ सोबत काम करताना खूप अभिमान, आनंद आणि समाधानाचा प्रत्यय आला. आज पदोन्नतीने नव्या पदावर रुजू झालेबद्दल या सत्कार प्रसंगी तोच अभिमान वाटत आहे. माझा गोकुळ सोबतचा असलेला ऋणानुबंध यापुढेही असाच सुरू राहील असे मनोगत कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम यांनी व्यक्त केले व सहकारातील अग्रगण्य संस्था असलेल्या गोकुळ ने उत्तरोत्तर उत्कर्षाचे नवनवीन मानदंड प्रस्थापित करावेत अशा सदिच्छा दिल्या.

          यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक यांचे हित व सहकारातील मार्गदर्शक तत्वांची जपणूक करत, गोकुळची वाटचाल चालू आहे. डॉ.महेश कदम यांनी गोकुळ दूध संघास शासन स्तरावर सर्वोतपरी मदत व मार्गदर्शन करावे. यावेळी त्यांना गोकुळ परिवारातर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes