+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule20 Mar 23 person by visibility 268 categoryराजकीय

कोल्हापूर : निवडणुका आल्या की राजाराम कारखान्यात हुकूमशाही आहे म्हणायचं आणि सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा हाच एककलमी कार्यक्रम विरोधकांचा सुरू आहे. पण विरोधकांनी हुकूमशाही बाहेर शोधण्याऐवजी स्वतःच्या संस्थांमध्ये डोकावून बघावं असा उपरोधिक सल्ला अमल महाडिक यांनी दिला. राजाराम कारखान्याच्या निवडणूक प्रचारार्थ टोप, संभापूर, पट्टणकोडोली, रुई, मिणचे या गावांचा दौरा पार पडला. टोप येथे आयोजित शेतकरी सभासद मेळाव्यात ते बोलत होते. राजाराम कारखान्याचा कारभार उत्तम प्रकारे सुरू आहे याची सभासदांना खात्री आहे, म्हणूनच गेली अनेक वर्ष त्यांनी आम्हाला सेवेची संधी दिली आहे, असेही अमल महाडिक यांनी नमूद केले. 

यावेळी बोलताना कारखान्याचे माजी चेअरमन शिवाजी रामा पाटील यांनी सर्जेराव माने यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. ज्यांच्या जीवावर तुम्ही संचालक झाला, चेअरमन झाला त्यांनाच विसरला ! केवळ स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही आज विरोधकांसोबत गेला आहात. पण राजाराम चे स्वाभिमानी सभासद तुमच्या या गद्दारीचं फळ तुम्हाला निश्चित देतील अशा शब्दात पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी सरपंच तानाजी पाटील, धनाजी पाटील, विजयसिंह घोरपडे, दामोदर पाटील, माजी सरपंच पिलाजी पाटील, माजी सभापती डॉ.प्रदीप पाटील,बाजार समिती सदस्य शिवाजी पाटील, वीरधवल पाटील, डॉ.संजय मिरजकर, विजयसिंह पाटील, माणिक पाटील, विष्णुपंत गायकवाड, डॉ. कल्लेश्वर मुळीक, लक्ष्मण पाटील तात्या, आनंदा भोसले, बापू पोवार, शिवाजी चौगले, बाबासाहेब पाटील, विठ्ठल पाटील, अमित पाटील, रमेश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि राजाराम कारखान्याचे सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.