+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustतांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी कापूस प्रक्रिया क्षमता ३० वरून ८०टक्के पर्यत वाढविण्याचे उद्दिष्ट* - *वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील* adjustदेशातील आघाडीच्या १५० संस्थामध्ये* *डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ* adjustचाइल्डलाइन संस्थेने केली `त्या` संबधितांची कानउघाडणी adjustराजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार बसवंत पाटील यांना जाहीर* adjustभारत राष्ट्र समिती पक्ष* adjustनग्न पूजेची आणिबाणी; महिलांनी सोडले नोकरीवर पाणी adjustशिवसेनेच्या वतीने “राज्याभिषेक सोहळा” उत्साहात संपन्न* adjust50 वर्षे शिवराज्यभिषेकदिन सोहळा साजरा करण्याची परंपरा प्रेरणादायी : मालोजीराजे छत्रपती adjustआपली आवड व कौशल्य ओळखून विद्यार्थ्यांनी करिअर निवडावे- डॉ महादेव नरके* adjustबालकांसाठी काम करणाऱ्या संस्था घेणार मनपा प्रशासकांची भेट
schedule15 Mar 23 person by visibility 83 category
- ‘नेशन बिल्डर्स अवॉर्ड्स’ने १२ शिक्षकांचा सन्मान
कोल्हापूर/
रोटरी क्लब व शिक्षक या दोहोंचे सामजिक कार्य मोठे असून कोल्हापूर जिल्ह्याच्या एज्युकेशन डेव्हलपमेंट इंडेक्स (शिक्षण विकास निर्देशांक) मध्ये त्यांनी भरीव योगदान द्यावे अशी अपेक्षा माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यानी केली. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर गार्गीज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेशन बिल्डर्स अवॉर्ड्स’ सोहळ्यात आमदार पाटील बोलत होते.
    आदर्श विद्यार्थी घडवण्याचा ध्यास घेऊन राष्ट्र उभारणीमध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील १२ शिक्षकांचा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते ‘नेशन बिल्डर्स अवॉर्ड’ने सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी रोटरीच्या कार्याचे आणि शिक्षकांच्या योगदानाचे कौतुक केले. शिक्षणामुळे समाजाची प्रगती होते. कोल्हापूर जिल्हा शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर असून जिल्ह्याच्या एज्युकेशन डेव्हलपमेंट इंडेक्स (शिक्षण विकास निर्देशांक) मध्ये मोठी भरारी घेण्यासाठी रोटरी आणि शिक्षकानी भरीव योगदान द्यावे असे आवाहन त्यानी यावेळी केले. 
  ‘रोटरी सनराईज’ चे अध्यक्ष हृषिकेश खोत यांनी प्रास्ताविक केले तर ‘रोटरी गार्गीज’च्या अध्यक्ष कविता घाटगे यांनी रोटरीच्या कार्याबद्दल माहिती दिली. रोटरी सनराईज हॉल येथे आयोजित केलेल्या या सोहळ्यासाठी सहाय्यक प्रांतपाल सुभाष कुत्ते, सहाय्यक प्रांतपाल अनिरुद्ध तगारे, ‘रोटरी गार्गी’च्या सचिव प्रीती मर्दा, पुरस्कारार्थी यांचे नातेवाईक आणि रोटरी सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रीती मंत्री आणि अंजली मोहिते यांनी केले तर रोटरी सनराईज चे सचिव राहुल कुलकर्णी यांनी आभार मानले.