+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...!
schedule19 Jan 23 person by visibility 150 category
उद्घाटन नारायण राणे आणि विखे पाटील यांच्या हस्ते तर 
प्रदर्शनाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते
सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी 
 - गोकुळ संचालक चेतन नरके यांची माहिती
- हॉटेल सयाजी येथे दूध परिषदेचे आयोजन
- शाहूपुरी जिमखाना येथे प्रदर्शन 
- देशभरातील 100हून अधिक संस्थांचा सहभाग

कोल्हापूर

     पश्चिम भारत आणि महाराष्ट्रातील सर्व सहकारी व खाजगी दूध संघांनी संयुक्तरीत्या शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित केलेल्या इंडियन डेअरी फेस्टिवलला शुक्रवार 20 रोजी पासून प्रारंभ होत आहे. या अंतर्गत हॉटेल सयाजी येथे आयोजित करण्यात आलेल्या दूध परिषदेचे सकाळी साडेअकरा वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री दीपक केसरकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती इंडियन डेअरी फेस्टिवल चे निमंत्रक गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी दिली आहे. 
  कोल्हापूर मध्ये प्रथमच गोकुळचे संचालक चेतन नरके यांच्या पुढाकारातून 20 ते 22 जानेवारी दरम्यान इंडियन डेअरी फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे. अर्थव्यवस्था, रोजगार, स्वयंरोजगार आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नात डेअरी क्षेत्राचे योगदान वाढवण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील संधी, आधुनिक ज्ञान तंत्रज्ञान याचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच यातील संधी आणि आव्हाने यावर चर्चा करून 2030 पर्यंतची दिशा आणि ध्येय धोरणे निश्चित करण्याच्या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन केले आहे.
    शुक्रवार 20 रोजी विक्टोरिया हॉल हॉटेल सयाजी येथे दूध परिषदेच्या उद्घाटनाने इंडियन डेअरी फेस्टिवल ला सुरुवात होईल. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रमुख मार्गदर्शन करतील. यावेळी खासदार धनंजय महाडिक खासदार संजय मंडलिक खासदार धैर्यशील माने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार विनय कोरे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
     दिवसभर चालणाऱ्या दूध परिषदेच्या पहिल्या सत्रास सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. यामध्ये दुग्ध व्यवसायातील बदलती परिस्थिती या विषयावर अनुप कुमार (अप्पर मुख्य सचिव, सहकार आणि पणन, महाराष्ट्र शासन), राजीव मित्रा (सीईओ, प्रभात डेअरी), निरंजन कराडे (टीम लीडर इनोव्हेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट सेल NDDB), योगेश गोडबोले (व्यवस्थापकीय संचालक, गोकुळ दूध संघ) आदी मान्यवर मार्गदर्शन करतील.
  दुपारी एक वाजता सुरू होणाऱ्या दुसऱ्या सत्रात दुग्ध व्यवसायातील नवे तंत्रज्ञान या विषयावर रामवन व्यंकटेशन (संस्थापक, डिजीटी टेक्नॉलॉजी प्रा. लि.), राहुल देशपांडे (सीईओ, एनव्हीकेअर लॅब), एन. के. भटनागर (सीईओ एव्हरेस्ट इन्स्टुमेंट प्रा. लि.), विश्वास चितळे (सीईओ, चितळे डेअरी) आदी मान्यवर मार्गदर्शन करतील.
  दुपारी तीन वाजता होणाऱ्या तिसऱ्या सत्रामध्ये पशुसंवर्धनाचे नियोजन आणि व्यवस्थापन या विषयावर परम सिंग (संस्थापक, मु फार्म प्रा. लि.), डॉ. शांताराम गायकवाड (व्यवस्थापक, गोविंद मिल्क अॅन्ड मिल्क प्रॉडक्ट), डॉ. दयावर्धन कामत (वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी, गोकुळ दूध संघ), डॉ. प्रफुल्ल माळी (पशुसंवर्धन तज्ज्ञ) आदी मान्यवर मार्गदर्शन करतील.
संध्याकाळी ४ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी पाच वाजता दूध परिषदेचा समारोप होईल. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि माझी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी काँग्रेस नेते माझी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हसन मुश्रीफ, राजेश टोपे, सतेज पाटील, आमदार पी एन पाटील, आमदार रोहित पवार, महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार ऋतुराज पाटील आमदार राजू आवळे राजेश पाटील आमदार जयश्री जाधव आमदार जयंत आसगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार आदी मान्यवर प्रमुख उपस्थित असणार आहेत.

    शाहूपुरी जिमखाना येथे प्रदर्शन 
  20 ते 22 दरम्यान शाहूपुरी जिमखाना येथे इंडियन डेअरी फेस्टिवलचे प्रदर्शन होणार आहे . येथे दुग्ध व्यवसायातील देशभरातील 100हून अधिक संस्थांचे स्टॉल असणार आहेत. या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी दूध व्यवसायिक यांना दुग्ध व्यवसायातील होत असलेली बदल तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.  

     लकी ड्रॉ पद्धतीने भरघोस बक्षिसे
 इंडियन डेअरी फेस्टिवल ला भेट देणारे दूध उत्पादक शेतकरी, व्यवसायिक यांच्यासाठी लकी ड्रॉ चे आयोजन केले आहे. प्रदर्शनामध्ये प्रवेश करताना संबंधितांनी एक फॉर्म भरून द्यायचा आहे. यामधून लकी ड्रॉ पद्धतीने भाग्यवान विजेत्यांना भरघोस बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार आहे. प्रथम क्रमांकासाठी म्हैस, द्वितीय क्रमांकासाठी चाफ कटर , तृतीय क्रमांक साठी मिल्किंग मशीन आणि उत्तेजनार्थ 10 विजेत्यांना सायलेज बॅग देण्यात येणार आहे.