Awaj India
Register
Breaking : bolt
ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी* *डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट*डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ स्पर्धेत* *कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय प्रथम*वंचित बहुजन आघाडीच्या करवीर तालुकाध्यक्षपदी नितीन कांबळेअवयवदान :मृत्यूनंतरचे खरे अमरत्त्व!डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून* *एआय आधारित हाय व्होल्टेज स्विचिंग युनिटचे संशोधन*मराठवाड्यात ‘गोकुळ’ ची दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार; नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 303 विद्यार्थ्यांची* *आयआयटी बॉम्बेतील ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड*

जाहिरात

 

कोल्हापूर मेडिकल असोसिएशन तर्फे व्यसनमुक्ती अभियान

schedule02 Apr 25 person by visibility 344 categoryशैक्षणिक


डीवायपी पॉलीमध्ये अभियानाची सुरुवात 

डॉ.डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक ,कसबा बावडा येथे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हा पातळीवरील  व्यसनमुक्ती अभियानाचा प्रारंभ  करण्यात आला  व्यसनमुक्ती तज्ञ डॉ.अविनाश उपाध्ये यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना व्यसनाच्या दुष्परिणामाबद्दल माहिती दिली.
डॉ.उपाध्ये म्हणाले, व्यसन ही आता सामाजिक समस्या बनत चालली आहे. अगदी सहजपणे युवा पिढी  व्यसनाच्या अधीन होत आहे. त्यामुळे याबाबत जागरूकता होणे गरजेचे आहे.

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर.एम. कुलकर्णी यांनी सांगितले की,  व्यसनामुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक त्रासातून युवा पिढीला वाचवण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. संपूर्ण जिल्हाभर हे अभियान राबवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. डॉ. संदीप पाटील यांनी व्यसन ही फॅशन होत असून त्यापासून विद्यार्थी दशेत प्रयत्नपूर्वक लांब राहायला हवं, असे नमूद केले.

विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती सारख्या विषयाची माहिती योग्य टप्प्यावर  मिळण्यासाठी केएमए ने हाती घेतलेले हे अभियान कौतुकास्पद आहे असे  प्राचार्य डॉ महादेव नरके यांनी  सांगितले.

  आभार केएमए सेक्रेटरी डॉ. अरुण धुमाळे यांनी मानले.
 डॉ .आदित्य कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सौ.उपाध्ये, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके,सर्व विभागप्रमुख आणि स्टाफ,विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा.राज अलासकर यांनी सुत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes