परिखपूलासंदर्भात मानगरपालिकेला कायदेशीर नोटीस
schedule03 Jun 23 person by visibility 85 category

शहाराच्या उत्तर दक्षिण भांगांना वाहतुकीच्या मार्गाने जोडणाऱ्या परिखापूलाला 5 हून अधिक वर्षे झाली. 30 ते 50 वर्षांपूर्वी हीच वाहतूक रेल्वे फटकातून व्हायची. पण रेल्वेने कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता हे फाटक अचानक बंद केले. त्यामुळे लोकांना परिख पुलाखालून वाहतूक चालू केली. याला रेल्वेची तसेच कोल्हापूर पालिका प्रशासनाचे अधिकृत मान्यता नाही. कारण रेल्वेच्या लेखी हा पूल फक्त पाणी जाण्याचा मार्ग आहे, वाहतुकीसाठी नाही. आज तर फाटक भिंत घालून बंद केल्यामुळे पादचारांनाही पुलाखालून जावे लागत आहे.
मागील पाच दहा वर्षात पुलाखालूनच्या वाहतुकीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली. त्याबरोबरच पावसाळ्यात तिथे पाणी साचण्याचा व मार्ग बंद होण्याचाही वारंवार प्रसंग उद्भवू लागला. पुलाचे वयोमान व वाहतुकीचा वाढता बोजा पाहता या खालून होणारी वाहतुकी धोकादायक आणि असलम बनू लागले म्हणून आम्ही परी फुल नूतनीकरण समितीच्या माध्यमातून 3.5 वर्षापूर्वीच एकत्र येऊन या संबंधाने विचार विनिमय चालू केला व हा प्रश्न स्थानिक पालिका प्रशासन तसेच रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणला व त्यांच्या या संदर्भात एकत्रित बैठक काही घडवून आणल्या. सदर पुलाखालून वाढलेली वाहतूक व असुरक्षितता लक्षात घेऊन आर्किटेक्ट असोसिएशन कडून विस्तारीकरण व मजबुतीकरणासह नूतनीकरणाचा डिझाईन सह आराखडा व पालिकेचे कन्सल्टंट श्री गुरव यांच्याकडूनही फटका खालून भुयारी मार्गाचा डिझाईन सह आराखडा तयार करून दोन्ही प्रस्ताव तीन वर्षांपूर्वीच पालिका प्रशासनाला एकत्रित सादर केले होते. यानंतर वेळोवेळी जिल्ह्याच्या आमदार खासदार पालकमंत्री यांना भेटून यांचे गांभीर्य ही लक्षात आणून दिले होते. वर्तमानपत्रांनीही आम्ही केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन वेळोवेळी हा प्रश्न त्यांच्या वृत्तपत्रातून मांडला व आवाज उठवला. पण यावर रेल्वे व पालिका प्रशासनाकडून काहीच कार्यवाही झाली नाही.
हे कमी की काय, मागील एक वर्षात रेल्वेने पास पुलावरून दोन रेल्वे ट्रॅकसह दोन नवीन प्लॅटफॉर्म उभे केले आहेत व विद्युतीकरणाचे जाळे उभे केले आहे. त्यामुळे आधीच कमकुवत असलेल्या या पुलावरचा भार आता जवळजवळ 25 पटीने वाढला आहे, जो पुलाखालूनच्या वाहतुकीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या पादचार्यांसाठी व तसेच वरून जाणाऱ्या रेल्वे व प्रवाशांसाठी ही जीवघेणा ठरू शकतो. आता या झालेल्या विकासामुळे रेल्वेने पारित पुलाच्या नूतनीकरणाचा प्रश्न केवळ अशक्य म्हणून एकतर्फी निकाली काढला आहे. धिम्म पालिका प्रशासन आणि वनमान्य रेल्वे प्रशासन या दोघांच्या नकारात्मक वृत्तीमुळे कोल्हापूरच्या नागरिकांना जीव मुठीत घेऊनच पुलाखालून प्रवास करावा लागत आहे.
राजकीय परिस्थिती पाहता उड्डाणपूल होईल तेव्हा होईल, त्याला कैक वर्ष लागतील पण तोपर्यंत एखादा अपघात होऊन मोठी जीवित हानी होण्याची आपण वाट बघायची काय? तसे होऊ नये म्हणून आम्ही पालिका व रेल्वे प्रशासनाला अखेर ही कायदेशीर नोटीस बजावत आहोत. त्याची वेळेत दखल घेतली तर बरे. अन्यथा आम्ही अखेरीस न्यायालयाचे दार ठोठावणार आहोत.
या कार्यक्रमासाठी सुशील हंजे, महेश दिघे, फिरोझ शेख, राजवर्धन यादव, संतोष रेडेकर, हिदायत मुल्ला, जिया मोमीन, संदीप कोळेकर, रियाज अहमद बरगीर, महेश सासणे, सुभाष कोळी, सुधीर हंजे, संजयसिंह घाटगे आदि उपस्थित होते.