
कोल्हापूर : शुक्रवार दि. २३ सप्टेंबर रोजी लक्ष्मी मिसळ आयोजित घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यंदा या स्पर्धेला १२३४ स्पर्धक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाप्रसंगी श्री. शामराव पाटील, श्री. अभिजित सूर्यवंशी, श्री. नैनेश शिंदे, कु. निखिल पहुजा, कु. किरण पाटील, कु. संकेत आंबूपे, श्री. ओंकार पोतदार, सौ. सोनाली पारखे, सौ. स्वाती पाटील या विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
या बक्षीस सोहळ्यास रामभाऊ गुरव, अमोल गुरव, अनुलेखा गुरव, दिपक शिरोडकर, अतुल लंगरकर, दिपक महामुनी, ओंकार शुक्ल, प्रतिमा बावडेकर, मंजिरी कपडेकर, अमीन मुल्लानी, अविराज गवस, अक्षय शिंदे, बघा आबा, शेखर पाटील, सुमित पाटील, ऐश्वर्या मुनींश्वर आणि अमर कोळेकर आदी उपस्थित होते.