या 10 कारणाने झाला महाडिक यांच्या पॅनलचा विजय
schedule25 Apr 23 person by visibility 1158 categoryराजकीय

'आमचं ठरलंय' ला 'आमचं एकच उरलय' या भावनिक आवाहनाला प्रतिसाद
कोल्हापूर (प्रशांत चुयेकर)
आवाज इंडिया प्रतिनिधी
श्री राजाराम सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सर्व उमेदवारांना दणदणीत विजय मिळवून दिला. या निवडणुकीत नेमकं काय घडलं यामुळे सत्ताधारी गटाला सत्ता राखण्यात यश मिळालं.पाहूया कोणती कारणे आहेत विजयाची.
1) वाढीव सभासदांचा फायदा सत्ताधारी यांना झाला.निकाल सत्ताधारी यांच्या बाजूने लागल्यामुळे 1800 मताचा गट्टा कसा पार करायचा असे आव्हान विरोधकांना होते.
2) कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत केलेला ठराव
आमदार सतेज पाटील गटाचे प्रमुख उमेदवार अपात्र करण्यास कारणीभूत ठरले.
3) केंद्रात भाजप राज्यात भाजप असल्यामुळे कारखान्याला काय कमी पडू देणार नाहीअसा विश्वास सभासदांना वाटला म्हणूनच पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कल देण्यात आला.
4) कधी नाही ते ह्या निवडणुकीत एका सभासदाला 5000 पासून 22 हजार पर्यंत रुपयाचा आनंद काही ठिकाणी बघायला मिळाला.
यामुळे सभासदांना इतर कारखान्याच्या तुलनेत दोनशे रुपये दर कमी देऊन सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने सभासदांनी कौल दिला.
5) या विजयासाठी आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने आदी लोकप्रतिनिधी उतरल्यामुळे सभासदांना आधार मिळाला.
6) 'कंडका' पाडणाऱ जहाल प्रश्नाला संयमाने उत्तर देत सभासदांच्या मध्ये भावनिक वातावरण निर्माण केलं.
7) या निवडणुकीत महाडिक स्वतःचे अस्तित्व टिकवत होते तर सतेज पाटील विजयात आणखीन भर घालत होते. यामध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी झालेला धडपडीचा विजय झाला.
8) 'आमचे ठरलय' या प्रश्नाला 'आमचे एकच उरलय' असेही बऱ्याच ठिकाणी भावनिक आव्हान केले जात
होते.
9) कोल्हापूरची जनता सर्वच विजय एकाला दिल्यापेक्षा विरोधक सुद्धा असावा म्हणून या निवडणुकीत राजारामला कल दिला असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
10) डिजिटल प्रचारात मध्येही महाडिक यांनी आघाडी घेतली होती. कोल्हापुरातील सर्व डिजिटल मीडियाना बातम्या दिल्या जात होत्या, त्यामुळे दुसऱ्या दिवशी बातम्या बघण्यापूर्वीच सभा झाल्या झाल्या बातम्यांचा सभासदांना आनंद घेता आला. तर अनेक ठिकाणी थेट लाईव्ह प्रक्षेपण केले जात होतं. याचा फायदाही सत्ताधारी यांना चांगला झाला असल्याचेही बोलले जात आहे. निवडणुकीत प्रचारात महाडिक यांची डिजिटल आघाडी अशा बातम्या सुद्धा सुरुवातीला प्रसिद्ध झाल्या होत्या.