महाराष्ट्र चेंबरच्या गव्हर्निंग काऊन्सीलची आज इचलकरंजीत बैठक
schedule06 Jul 23 person by visibility 290 categoryउद्योग
राज्यभरातील अग्रणी व्यापारी - उद्योजक उपस्थित राहणार*
*नुतन आयुक्त ओमप्रकाश दिवटे करणार उद्घाटन*
मुंबई ः महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर च्या गव्हर्निंग काऊन्सील ची बैठक शुक्रवार दि. 07 जुलै रोजी इचलकरंजी येथे होत आहे. अशी माहीती चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. इचलकरंजी येथील कल्लाप्पा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये सकाळी 11 वा. बैठकीस सुरूवात होईल.
या बैठकीचे उद्घाटन इचलकरंजी महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे करणार आहेत.
या बैठकीस राज्यातील व्यापारी उद्योजक उपस्थित राहणार आहे यामध्ये मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, जळगांव, धुळे, पूणे पश्चिम महाराष्ट्र, कोकणसह सह अन्य जिल्ह्यातील गव्हर्निंग काऊन्सील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत राज्याच्या व्यापार, उद्योग क्षेत्राच्या महत्वाच्या विषयावर चर्चा, निर्णय व ठराव केले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जात आहे.