+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...!
schedule12 Apr 23 person by visibility 89 categoryराजकीय
कोल्हापूर : आवाज इंडिया  

राजाराम कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचे आणि सभासदांचे हित पाहण्यापेक्षा स्वतःच हित साधत कारखाना स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न काही मंडळी गेली काही वर्ष करत आहेत.त्यामुळे या निवडणुकीत न्यू पॅलेस, जुना बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठ येथील सर्व सभासद सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडीला मतदान करून त्यांच्या विजयात आपला वाटा उचलतील ,असा विश्वास मालोजीराजे छत्रपती यांनी यावेळी व्यक्त केला.
परिवर्तन आघाडीच्या वतीने आयोजित सभासद संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

मालोजीराजे छत्रपती पुढे म्हणाले, राजाराम कारखाना हा सहकारी तत्त्वावरील सर्वात जुना कारखाना आहे .त्यामुळे या कारखान्याने जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस दर देणे अपेक्षित होते मात्र याउलट इथे चित्र पहायला मिळते आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक कमी ऊस दर इथे दिला जातो. ही शोकांतिका आहे.या निवडणुकीत सत्ताधारी मंडळींनी सत्तेचा गैरवापर करून उमेदवार अपात्र ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. सतेचा गैरवापर करून उमेदवार अपात्र ठरवण्याचा जो उपद्व्याप सत्ताधारी मंडळीनी केला. त्यामळे या निवडणुकीत सभासद मात्र नक्की परिवर्तन घडवणार आहेत.

ते पुढे म्हणाले , आ.सतेज पाटील यांचे नेतृत्व गेल्या काही वर्षात जिल्ह्याला विकासाच्या वळणावर घेऊन जाणारे नेतृत्व आहे. हे आपण जवळून पाहिल आहे . मी त्याचा गेल्या काही वर्षाचा साक्षीदार आहे. एखादी सहकारी संस्था कशी चालवावी किंवा एखाद्या गोष्टीचे नियोजन कसं व्यवस्थितपणे करावं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
 
यावेळी आ. सतेज पाटील म्हणाले , मालोजीराजे छत्रपती यांचा परिवर्तन आघाडीला पाठिंबा हा या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट आहे. या पाठिंब्याबद्दल मी त्यांना विशेष धन्यवाद देतो. राजाराम महाराजांनी संस्थान काळात उभ्या केलेल्या या कारखान्याला गतवैभव मिळवून देईन,याची खात्री या निमित्ताने देतो.

यावेळी न्यू पॅलेस सोसायटीचे चेअरमन अशोक जाधव,व्हा चेअरमन कृष्णात पाटील
कर्नल विजयसिंह गायकवाड
बबनराव इंगवले, शारंगधर देशमुख ,शशिकांत पाटील,
राजाराम गायकवाड,अर्जुन माने,
 उपस्थित होते.