. ए. व्ही. ढाले (सर) यांच्या सेवानिवृत्ती निमित्त कार्याचा आढावा
schedule31 May 23 person by visibility 330 categoryशैक्षणिक
दि न्यू एजुकेशन सोसायटी कोल्हापूर संचालित नांदणी हायस्कूल, नांदणी येथील सहायक शिक्षक श्री. ए. व्ही. ढाले सर हे प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. या संस्थेच्या एकाच शाखेमध्ये 37 वर्षे त्यांनी आपली सेवा बजावली आहे. ढाले सरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी उत्साहाने व प्रामाणिकपणे अध्यापन केले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण कुमार विद्या मंदिर खोची व माध्यमिक शिक्षण राजे शहाजी हायस्कूल, खोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर या ठिकाणी झाले व्यावसायिक शिक्षण (डी.एड), अध्यापक विद्यालय पेटाळा, कोल्हापूर येथे पूर्ण केले त्यानंतर नांदणी हायस्कूल, नांदणी या ठिकाणी 1986 साली सहायक शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले गणित व मराठी विषयाचे उत्कृष्ट शिक्षक म्हणून नावारुपास आले.
शिष्यवृत्ती परीक्षा परीक्षा विभाग, सहलीचे नियोजन, गणित प्रावीण्य परीक्षा, विज्ञान प्रदर्शन स्कूल कमिटी सदस्य, अशा विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडल्या आहेत.
साधी राहणी, मनमिळावू आनंदी व प्रसन्न चेहरा व इतरांविषयी आदर असाच त्यांचा वसा आहे.
आपुलकी व निष्ठा असणारे त्यांची दोन्ही मुलं चि. अनिकेत हा एम.बी.ए. व सॉफ्टवेअर इंजिनीअर
असून, कन्या कु. प्राची ही डॉक्टर आहे. संस्कारी कुटूंब घडविण्यात सौ. व श्री. ढाले सरांचा मोलाचा
वाटा राहिला.
आंतरभारती विद्यालय इचलकरंजी येथे कार्यरत असणाऱ्या सौ. उज्वला आनंदराव ढाले मॅडम यांची शैक्षणिक कार्यास त्यांना मोलाची साथ मिळाली. शाळेतील विविध जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडताना कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंड उजळते, त्याचे सोने होते, अगदी त्याच प्रमाणे ज्या माणसाच्या अस्तित्वामुळे अनेक विद्यार्थी घडले तेच आनंदराव ढाले सर.
शासनाने आयोजित केलेली वेगवेगळी प्रशिक्षणे पूर्ण करून बदलत्या शिक्षण प्रणालीचा पूरेपूर वापर करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर केला आहे. संस्थांतर्गत शाळा तपासणी पथकात सहभागी होऊन संस्थेच्या अनेक माध्यमिक शाळा तपासण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
त्यांनी आपल्या प्रभावी अध्यापनाने अनेक उद्योजक, डॉक्टर्स, इंजिनियर, वकील, प्राध्यापक,
शिक्षक, पोलिस, पी. एस आय इन्कमटॅक्स ऑफिसर असे नामवंत विद्यार्थी घडविले आहेत.
स्वर्गीय म. न. अस्वलेसाहेब, एस. आर. पाटील, बी. जी. ऐनापुरे व मान. श्री. बी. डी. सावळवाडे, श्री एन. डी. टारे, श्री. एस. आर. बुबणे श्री. जे. बी. पाचोरे सौ के बी सावळवाडे मॅडम, श्री. एस. एस माळी श्री. जी. एस. कोळी, श्री. एम जी कांबळे, श्री. डी. डी. माने या सर्व दिग्गजांच्या मार्गदर्शनामुळे ते अध्यापनाचे काम उत्कृष्ट व यशस्वी करू शकले..
मातृ संस्थेचे अध्यक्ष मान. निर्मलकुमार लोहिया साहेब, उपाध्यक्ष मान नितीन वाडीकर साहेब,
मान विनोदकुमार लोहिया साहेब, संस्थेचे सेक्रेटरी मान. पी. एस. हेरवाडे सर जॉईन सेक्रेटरी मान. एस.
एस. चव्हाण सर व संस्थेचे इतर मान्यवर व पदाधिकारी, शाळा समितीचे अध्यक्ष, मान न. म. अस्वले
व सर्व सदस्य सल्लागार समितीचे सर्व सदस्य यांची प्रेरणा व प्रोत्साहन त्यांना मिळाले.
शाळेच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या उत्कृष्ट निकालाबद्दल माजी शालेय शिक्षणमंत्री मान हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात करण्यात आला होता शिक्षक नेते आदरणीय दादा लाड सर तसेच पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार मान प्रा. जयंत आसगावकर साहेब यांनी शुभेच्छा पत्रे देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे..
मान मुख्याध्यापक एम. सी. जयकर, पर्यवेक्षिका सौ. एस. ए. देसाई मॅडम, कोलेज विभाग प्रमुख श्री. आर. एस. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. सतीश चिपरीकर, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, बालवाडीच्या सर्व शिक्षिका, ज्युनिअर कॉलेजच्या सर्व प्राध्यापिका या सर्वांच्या सहकार्यामुळेच ते शाळेची व संस्थेची 37 वर्षे प्रदीर्घ सेवा करू शकले.
त्यांना नांदणी हायस्कूल परिवारामार्फत सेवा निवृत्तीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!
त्यांचे भावी आयुष्य सुखाचे समाधानाचे दीर्घायुषी व भरभराटीचे जावो हि सदिच्छा !!!
शब्दांकन मा. सतीश चिपरीकर
राज्य पुरस्कार महाराष्ट्र शासन