कोदे उपसरपंचपदी सौ.शोभा पाटील
schedule14 Jan 23 person by visibility 204 categoryराजकीय
गगनबावडा आवाज इंडिया प्रतिनिधी
गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रुक येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ. शोभा दिलीप पाटील यांची निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सौ. शोभा विलास पाटील होत्या. तर निवड अधिकारी ग्रामसेवक बाजीराव देसाई होते.सरपंच सौ शोभा पाटील ह्या आम.सतेज पाटील गटाचे विलास पाटील यांच्या पत्नी आहेत तर उपसरपंच सौ शोभा दिलीप पाटील ह्या जी. एस. कांबळे गटाच्या असून कोदे गावचा कारभार आता दोन शोभांच्या हाती देण्यात आला आहे. यावेळी मानवाधिकार संघटनेचे जी एस कांबळे ,रघुनाथ पाटील, सुरेश पाटील, दिलीप पाटील, कृष्णा चिले, श्रीकांत कांबळे, गौतम कांबळे, शेणवडे पोलीस पाटील उत्तम पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते..