Awaj India
Register
Breaking : bolt
श्री एस एच पी हायस्कूल 100 टक्के निकाल नागपूरमधून सुरू झाला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा महाराष्ट्र दौरा*कुरुंदवाड आगाराला ८ नवीन बसेस देवू : ना. प्रतापराव सरनाईक 10 वी चा निकाल मंगळवारी या संकेतस्थळावर पहारोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ*डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सर्वसाधारण विजेतेपद*लोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय :आमदार सतेज पाटील आनदराव पाटील चुयेकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९७%नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्केडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल ९९.१७ टक्के*

जाहिरात

 

स्त्री- पुरुष समानतेतूनच राष्ट्राची प्रगती शक्य* -सौ. वृषाली पृथ्वीराज पाटीऋ

schedule10 Mar 23 person by visibility 167 category

*
-डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये महिला दिन उत्साहात
 
कोल्हापूर/ प्रतिनिधी
उत्तम समाज व राष्ट्रउभारणीच्या कार्यात स्त्रीची भूमिका ही नेहमीच महत्वाची राहिली आहे. पुरुष आणि स्त्री असा कोणताही भेदभाव न करता, महिलांचा सन्मान राखून वाटचाल सुरु ठेवल्यास कोणतेही यश अप्राप्य नाही. स्त्री- पुरुष समानतेतूनच समाजाची व राष्ट्राची प्रगती शक्य आहे. महिलानी कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न कधीही थांबवू नयेत, सातत्यपूर्ण प्रयत्नातून निर्धारित लक्ष्य नक्कीच गाठता येईल असे आवाहन सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील यांनी केले. कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
   महिलाच्या सन्मानाप्रती दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यावर्षी ‘लैंगिक समानतेसाठी नावीन्य आणि तंत्रज्ञान’ ही संकल्पना राबविण्यात आली. सौ.वृषाली पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थितीत महिला अधिकारी व कर्मचार्यांनी केक कापून महिला दिनाचा आंनंद साजरा केला. यावेळी वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. शिंपा शर्मा, डॉ वसुधा सावंत, डॉ राजश्री माने यांच्यासह सर्व महिला अधिकारी उपस्थित होत्या
     यावेळी बोलताना सौ वृषाली पाटील म्हणाल्या, डी. वाय. पाटील ग्रुपने नेहमीच स्त्री-पुरुष समानतेचे तत्व पाळले आहे. डी. वाय. पाटील हॉस्पिटल हे याचे उत्तम उदाहरण आहे. हजारो लोकांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या या हॉस्पिटलचे नेतृत्व डॉ. वैशाली गायकवाड या प्रभावी व सक्षमपणे करत आहे. अन्य महिला अधिकारी- कर्मचारीही त्याच ताकदीने काम करत आहेत. कोरोनाविरोधी लढयातही महिला शक्ती आघाडीवर होती. महिला आहे म्हणून स्वत:ला कधीच कमी लेखू नका, नाउमेद होऊ नका. सर्वच स्त्रियामध्ये हार्डवर्क करण्याची क्षमता निसर्गत:चा मिळाली, ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. ही ताकद ओळखून सतत प्रयत्नशील राहिल्यास निश्चितच यश मिळेल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
  जागतिक महिला दिनानिमित्त हॉस्पिटलमध्ये ‘जेंडर ईक्विलीटी वॉल’ तयार करण्यात आली होती. यावर सर्व कर्मचाऱ्यानी आपल्या आयुष्यातील लैगिक समानतेच्या अनुभवाबद्दल माहिती लिहिली. माता, भगिनी, बहिण, पत्नी, मुलगी अशा अनेक रुपामध्ये भेटणाऱ्या स्त्रीचे महत्व, मिळालेली सकारात्मक दिशा, तिचे पाठबळ असे विविध अनुभव याठिकाणी नमूद करण्यात आले होते. त्याचबरोबर हॉस्पिटलच्या भूलतज्ञ डॉ. अनिता कदम व डॉ अनुपमा सहस्रबुद्धे यांनी केदारकांथ ट्रेकबाबतचे अनुभव कथन केले. सायबर कॉलेजच्या विद्यार्थ्यानी स्त्रीशक्ती या विषयावर पथनाट्य सादर केले. यावेळी डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या सर्व महिला वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
   कुलपती डॉ संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes