Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये बजाज कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न डॉ. सुनील जे. रायकर यांचे 3डी प्रिंटिंगवर व्याख्यानचंदगड तालुक्यात विहिरीचे पैसे पाण्यातहोय, मी भांडी घासतोय!पोपट पवार,सर्जेराव नावले,शेखर पाटील,आदित्य वेल्हाळ,सचिन सावंत, नयन यादवाड यांना कोल्हापूर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीरडॉ. कोडोलीकर यांना धम्मविचार साहित्य गौरव पुरस्कार जाहीरडी. वाय. पाटील विद्यापीठात* *सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*सबका मंगल हो रूपाली पाटीलडी. वाय. पाटील मेडिकल संघाला विजेतेपदसतेज कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तुफान तुडुंब गर्दी*

जाहिरात

 

समतावादी सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र आयोजित ऑनलाईन व्याख्यानमाला

schedule18 Sep 20 person by visibility 610 categoryसंपादकीय

कोल्हापूर - सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने समतावादी सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र यांच्यावतीने सत्यशोधक अण्णा भाऊ साठे ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. ही व्याख्यानमाला 21 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत आयोजित केलेली आहे. सदर व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, वक्ते आपले विचार मांडणार आहेत. समतावादी सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्रचे संस्थापक प्रा.डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होणार आहे. २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता प्रसिद्ध मानवी हक्क कार्यकर्ती दिशा पिंकी शेख (अहमदनगर)या 'लिंगभाव चळवळ:एक आकलन' या विषयावर आपली मांडणी करणार आहेत. 22 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता विद्रोही चळवळीचे नेते कॉ.धनाजी गुरव सर(इस्लामपूर) हे 'बळीराजा:इतिहास आणि वर्तमान' या विषयावर आपली मांडणी करणार आहेत. 23 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे अभ्यासक प्रा.दिनेश पाटील (वारणानगर) हे 'महाराष्ट्राच्या चळवळीचे आधारवड:महाराजा सयाजीराव गायकवाड' या विषयावर मांडणी करणार आहेत. 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता भटक्या विमुक्त समाजाचे अभ्यासक प्रा.डॉ.अर्जुन जाधव (इचलकरंजी) हे 'भटक्या विमुक्तांच्या चळवळी' या विषयावर मांडणी करणार आहेत. 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता महिला प्रश्नांच्या अभ्यासक प्रा.डॉ. अर्चना जगतकर-कांबळे (कोल्हापूर) या 'परिवर्तनवादी चळवळीत महिलांचे योगदान' या विषयावर आपली मांडणी करणार आहेत. ही व्याख्यानमाला झूम ऍप द्वारे होणार आहे यासाठीचा मीटिंग id- 875 5416 5252 हा असून पासवर्ड 12345 आहे, तसेच या व्याख्यानमालेचे live प्रसारण Amol Mahapure या फेसबुक या पेज वरून देखील होणार आहे. सदर व्याख्यानमालेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समतावादी सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष प्रा.डॉ.माधव गादेकर उपाध्यक्ष प्रा.प्रकाश नाईक,सचिव प्रा.अमोल महापुरे, समतावादी महिला मंचच्या अध्यक्षा प्रा.पुष्पलता सकटे, प्रा. प्रकाश कांबळे यांनी केलेले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes