Awaj India
Register
Breaking : bolt
रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ*डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सर्वसाधारण विजेतेपद*लोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय :आमदार सतेज पाटील आनदराव पाटील चुयेकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९७%नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्केडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल ९९.१७ टक्के*मित्र-मैत्रिण नाते किती ग्रेट?निवडणुकीनंतर लाडकी बहीण राज्य सरकारला सावत्र झाली; आमदार सतेज पाटील यांची टिका...शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज ; अरुण डोंगळेशालेय आयडी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : प्रवीणभाई माणगावे

जाहिरात

 

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरीच्या वतीने ऑनलाईन काव्य संमेलन उत्साहात

schedule22 Dec 22 person by visibility 665 categoryशैक्षणिक


आवाज इंडिया
(युवराज राजीगरे-चुयेकर)

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरीच्या वतीने ऑनलाईन काव्य संमेलन घेण्यात आले.
   संत गाडगेबाबा महाराज पुण्यदिना निमित्त ऑनलाईन काव्य संमेलन व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडला .
             साहित्यकार व थोर विचारवंत प्रा. सुरेश कुऱ्हाडे यांनी अध्यक्षपद स्विकारले . कोल्हापूर जिल्हा नूतन अध्यक्ष युवराज पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन करण्यात आले.
या संमेलनास लाभलेल्या पाहुण्या सुजाता पेंडसे थोर साहित्यकार यांची व अध्यक्षांची ओळख पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ .सुवर्णा पवार मॅम यांनी करून दिली यानंतर कविसंमेलनास सुरवात झाली . संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या एकापेक्षा एक रचना सादर करण्यात आल्या. यामध्ये कवयित्री उर्मिला तेली मॅम, मेघा शहा मॅम, माणिक नागावे मॅम, वृषाली होगाडे मॅम व सन्मा .कवि सुभाष चोपडे सर , दशरथ ( आण्णा ) कांबळे सर, सुरेश वडर सर, प्रविण मोरे सर , संकेत पाटील सर यांनी सहभाग नोंदविला .
    जेष्ठ कवयित्री डॉ . रेखा पौडवाल यांच्या वाढदिवसानिमित्य घेणेत आलेली उजळली भाग्यरेखा हा स्पर्धा निकाल जाहिर करणेत आला . त्यांनी विजेत्यांना रू .२९७५ चे बक्षिस जाहिर केले . स्पर्धा परिक्षक सौ . वर्षा फटाकळे यांनी उत्कृष्ट निरपेक्ष केले होते .
         संमेलनाचे अध्यक्ष प्रा . कुराडे सरांनी साहित्या बद्दल , व पाहुणे सन्मा . सुजाता पेंडसे यांनी कविता कशी असावी या बद्दल मार्गदर्शन केले .
           जिल्हा समिती खजिनदार शिवानी कानकेकर मॅम यांनी अतिशय उत्कृष्टरित्या सुत्रसंचालन केले .  
         जिल्हा समिती कार्याध्यक्ष युवराज राजीगरे सर यांनी सर्व उपस्थिता सह कार्यकारिणी विशाल शिरसट सर, विजय जायभाये सर, सचिव सुंमत पाटील सर, .शिल्पा मुसळे मॅम, . चैताली कापसे मॅम , छाया देसले मॅम व सर्व कवि कवयित्री यांचे मनःपुर्वक आभार मानून सव्वा तास चाललेल्या या सुंदर काव्य संमेलनाची सांगता झाली .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes