कुंभी कासारी आणि नरके पॅनल याची विश्वासार्हताच पॅनलला विजयी करेल
schedule03 Feb 23 person by visibility 165 category

कोल्हापूर आवाज इंडिया
कुंभी कासारी नरके पॅनल आणि विश्वासार्हता हे कारखान्याच्या स्थापनेपासून समीकरण जमले आहे. सभासदांनी नरके पॅनलच्या ऋणबंधात राहायचं ठरवलेलं आहे. म्हणूनच सभासदांनी प्रचंड मतांनी निवडून देण्याचा ठाम निर्णय घेतला असल्याचे चित्र दिसत आहे.
कुंभी- कासारी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत नरके पॅनलच्या उमेदवारांना प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
चेअरमन चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली कसबा बोरगाव या ठिकाणी झालेल्या प्रचार सभेत सरपंच सतीश पाटील,पोलीस पाटील संदीप पाटील, गजानन पाटील,तानाजी चौगुले, एम. वाय. कांबळे, अमित पाटील, बंडा पाटील, शामराव मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते.
घोटवडे नाणुद्रे, तेलवे या गावात प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोलोली या ठिकाणी झालेल्या सभेत मुरारी पाटील, रंगाराव पाटील, तुकाराम चौगले, अंकुश पाटील, संभाजी जाधव, एस.के पाटील, जयसिंग गुरव, विश्वास चव्हाण, तानाजी ढवळे, दिनकर पाटील,चंद्रकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.