दि एज्युकेशन सोसायटीचे अनिधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश
schedule07 Sep 23 person by visibility 401 categoryशैक्षणिक

कोल्हापूर (आवाज इंडिया प्रतिनिधी)
येथील न्यू एज्युकेशन सोसायटीमध्ये अनिधिकृत बांधकाम केलेले आहे. याबाबत तक्रार करूनही लवकर कारवाई
होत नव्हती. अखेर महानगरपालिकेकडून बांधकाम पाडण्याचे नोटीस काढण्यात आले आहे.
या संस्थेच्या जागेमध्ये अतिक्रमण झालेले आहे. याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. शिक्षणाधिकारी, इस्टेट विभाग, नगर रचना विभाग,प्राथमिक, महानगरपालिका या ठिकाणी अनेक तक्रारी आलेल्या आहेत मात्र या तक्रारीवर कारवाईत दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे
न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर येथील मिळकतीमध्ये विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कुल या मिळकतीमध्ये मागील बाजूस केलेले ९ फुट बाय 50 फुट मापाचे कंपाऊंड वॉलचे बांधकाम केलेले आहे. व आर. एन. सामाने विद्यालय हायस्कुलच्या मागील बाजुस सध्या ९ फुट बाय 50 फुट मापाचे कंपाऊंड वॉलचे बांधकाम चालू आहे. तसेच एस.एम. लोहिया हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे अंदाजे २००० चौ.मी. चे तात्पुरते स्वरुपाचे शेडचे अनाधिकृत बांधकाम केलेले आहे. ते काढून घेण्यासाठी संदर्भिय नोटीसव्दारे कळविलेल होते. दिलेल्या मुदतीत त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. अद्यापही त्यांनी सदर विनापरवाना बांधकाम उतरवून घेतलेले नाही. त्यामुळे येत्या आठवड्यात बांधकाम पाडण्यात येणार आहे.