गोकुळमार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन
schedule07 Nov 23 person by visibility 528 categoryआरोग्य

जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा चेअरमन – मा.श्री.अरुण डोंगळे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) संघामार्फत दूध उत्पादन वाढीसाठी व उत्पादकांना प्रोत्साहन देणेसाठी प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्पर्धा घेणेत येते. त्याचप्रमाणे याहीवर्षी संस्थांचे दूध उत्पादक सभासदांचे जास्तीत जास्त दूध देणाऱ्या म्हैशी व गाईसाठी ‘गोकुळ श्री’ स्पर्धा आयोजित केली आहे. सदरची ‘गोकुळ श्री’ स्पर्धा दि.२०/११/२०२३ ते ३०/११/२०२३ या कालावधीत घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूध उत्पादक यांनी आपल्या संस्थेच्या लेटरहेडवर चेअरमन/सचिव यांच्या सही शिक्क्यानिशी संघाचे बोरवडे,लिंगनूर,तावरेवाडी,गोगवे,शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात दि.११/११/२०२३ इ. रोजी अखेर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी म्हैस कमीत कमी १२ लिटर प्रतिदिनी व गाय २० लिटर प्रतिदिनी दूध देणारी असणे आवश्यक आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना म्हैस १ ते ३ क्रमांक व गाय १ ते ३ क्रमांक अशा सहा क्रमांकांना बक्षीस, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन ‘गोकुळ श्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बक्षीसाची रक्कम पुढीलप्रमाणे.
प्रथम क्रमांक म्हैस ३०,०००/-,गाय २५,०००/-,द्वितीय क्रमांक म्हैस २५,०००/- गाय २०,०००/-
तृतीय क्रमांक म्हैस २०,०००/- गाय १५,०००/-
स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती स्वतंत्र परिपत्रकाने प्राथमिक दूध संस्थांना कळविण्यात आली असून गोकुळ संघामार्फत आयोजित केलेल्या या ‘गोकुळ श्री’ स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले आहे.