म्हाळुंगे येथील लघुउद्योजकांना इशारा
कोल्हापूर
म्हाळुंगे तालुका करवीर येथील
लघुउद्योजकांचा व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा कुटील डाव ग्रामपंचायतीने आखला आहे. मंगळवार(दिनांक 15) पर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता आम्ही आत्मदहन करणार आहोत, असा इशारा लघु उद्योजकांनी केला. याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
रस्ता मोठा असतानासुद्धा आम्हा लघुउद्योजकांना हटवून ग्रामपंचायत प्रशासन काय सुशोभीकरण करणार आहे सुशोभीकरण करायचं असेल तर आमचं थडगं बांधून सुशोभिकरण करा असे आवाहन लघु उद्योजकांनी केले.
तीस वर्ष व्यावसायिक कर आम्ही भरत आहोत गेल्या तीन वर्षापासून आमच्या व्यावसायिक कर घेतलेला नाही सुशोभीकरणाच्या नावाखाली आमचे त्याच ठिकाणी मागे सरकून पुनर्वसन केले. आत्ता पुन्हा आम्हाला तेथून हटवण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.
आम्हाला दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात, आम्हाला व्यवसाय करण्यासाठी व्यवसायिक कर भरून घ्यावा,आम्हाला न्याय मिळावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आम्हाला न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आत्मदहन करणार आहोत, असा इशाराही लघु उद्योजक यांनीदिला
यावेळी सजन चौगुले, सुकुमार शेंडूरे ,अजित मोरे, संभाजी पाटील, धनाजी पाटील,, शिवाजी मोरे, रेखा मोरे, नारायण मोरे, आबासो मोरे उपस्थित होते.