पी. व्ही. सिंधूने जिंकले सुवर्ण, भारताची पदक संख्या 56
schedule08 Aug 22 person by visibility 393 categoryक्रीडा

असित बनगे : प्रतिनिधी आवाज इंडिया
बर्मिंगहॅम ,08 ऑगस्ट 2022
भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पी व्ही सिंधुने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीचे सुवर्णपदक जिंकले आहे. तिने कॅनडाच्या लीचा 21-15,21-13 असा पराभव करून सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. त्याचबरोबर लक्ष सेन याने पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठले आहे. त्याचा सामना मलेशियन शटलर योंग एनजीशी होणार आहे.
सिंधूच्या या पदकासमवेत भारताने एकूण 19 सुवर्ण पदके मिळवली आहेत. त्याचबरोबर भारताची एकूण पदक संख्या 56 वर पोहोचली आहे.या कामगिरीने क्रीडामंत्री रिजिजू यांनी सिंधूचे अभिनंदन केले आहे. सिंधूचा देशाला अभिमान आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत.
महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकण्यासाठी अंतिम फेरीत कॅनडाच्या मिशेल लीला पराभूत करणाऱ्या पी.व्ही .सिंधूकडे आता पाच CWG पदके आहेत. तिने 2014 मध्ये एकेरीत कास्य 2018 मध्ये एकेरी रौप्य पदक जिंकले होते .ती 2018 मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मिश्र संघाचा आणि बर्मिंगहॅम मधील रौप्य पदक जिंकणाऱ्या मिश्र संघाचा भाग होती.