गौरा इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट कडून पॅन इंडिया इव्हेंट चे आयोजन
schedule27 Aug 22 person by visibility 250 categoryलाइफस्टाइल

असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर नगरीमध्ये प्रथमच राष्ट्रीय दर्जाच्या भव्य अशा पॅन इंडिया इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. गौरा ईव्हेंट्स अँड इंटरटेनमेंट कडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा 7 जानेवारी 2023 पर्यंत कोल्हापुरात होणार आहे, अशी माहिती गौरा ईव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटच्या संस्थापिका संचालिका गौरी नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
या स्पर्धेमध्ये देशभरातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. यासाठी 13 सप्टेंबर आणि 14 सप्टेंबर रोजी सयाजी हॉटेल आणि संजय घोडावत विद्यापीठ येथे ऑडिशन होणार आहेत. या शोचे शीर्षक 'सेलेस्टीअल ब्युटी ऑफ द ग्रेट भारत'( मिस आणि मिसेस) ग्रेट भारतचा वीर पुरुष (मिस्टर) असे आहे.
कोल्हापुरात होणाऱ्या या स्पर्धेमध्ये पारंपारिक वेशभूषेचा समावेश असणार आहे .तीन ते चार फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा होईल. कोल्हापूरच्या मुला मुलींना बॉलीवूड ,हॉलिवूड चित्रपटांमध्ये संधी मिळावी आणि त्यांचे मनोबल वाढावे हा या स्पर्धेमागचा हेतू आहे .ऑडिशन राऊंड मध्येे निवड झालेल्या स्पर्धकांना नावाजलेल्या कोरिओग्राफर्स कडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशी माहिती गौरी नाईक यांनी दिली. संजय घोडावत ग्रुप व सयाजी या स्पर्धेचे प्रायोजक असणार आहेत.
यावेळी पत्रकार परिषदेस गौरी नाईक,विनायक भोसले,जयंत पाटील,संजय पाटील उपस्थित होते.