+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust अॅड. दिलशाद मुजावर यांना मरणोत्तर “अरुणोदय पुरस्काराचे आज वितरण adjustगोकुळ’ मार्फत आमदार पी.एन.पाटील साहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना adjustडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल १०० टक्के* adjust*डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या* *१९ विद्यार्थ्यांची बजाज कंपनीमध्ये निवड* adjustडॉ. प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा adjustS3 सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग* adjust*प्रा. प्रविण माने यांना पीएच. डी.* adjustडी वाय पाटील फार्मसी मध्ये* *‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन* adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट*
schedule18 Jul 20 person by visibility 3300 categoryलाइफस्टाइल
लॉकडाऊनमुळे दोन आठवडे प्रवासी पास बंद
: जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पाठविली सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे
आवाज इंडिया न्यूज
कोल्हापूर-(प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोमवारपासून कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येण्यासाठी दिले जाणारे सर्व प्रवासी पास दोन आठवडे बंद ठेवावेत, असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांना शनिवारी पाठविली आहेत.
राज्याच्या विविध भागात अडकलेल्या प्रवासी, विद्यार्थी, कामगार, आदींना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्याकडून परवाने दिले जातात. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार(दि.२१)पासून सात दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातून कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी दैनंदिन किंवा कोणत्याही स्वरूपाचे प्रवासी पास देण्यात येऊ नयेत. केवळ तातडीची वैद्यकीय सुविधा, मालवाहतूक व अत्यावश्यक सेवांना सूट राहील. अशी विनंती या पत्राद्वारे जिल्हाधिकारी देसाई यांनी केली आहे.