+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...!
schedule19 Aug 22 person by visibility 198 categoryसामाजिक


 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रीनफन फौंडेशनच्या वतीने वृक्षारोपण


मुंबई प्रतिनिधी :


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ग्रीनफन फौंडेशनच्या वतीने केशव व्यायामशाळा मैदान, मालाड वेस्ट, मुंबई याठिकाणी बॉलीवूड अभिनेता कृष्णा चतुर्वेदी यांच्या हस्ते 75 वेगवेगळी पर्यावरणपूरक झाडे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला.

 त्यावेळी अभिनेते कृष्णा चतुर्वेदी यांनी उपस्थित लोकांशी संवाद साधताना म्हणाले , सर्वांनी एकत्र येऊन देशाला स्वच्छ व हिरवेगार केले पाहिजे त्यासाठी वृक्षारोपण करायला हवे. शहरांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली पाहिजे. मनुष्याला शंभर वर्षे जगायचे असेल तर झाडेचं लावली पाहिजेत. वृक्षप्रेम हे ईश्वर प्रेमाप्रमाणेच आहे ते सर्वांनी करायला हवे. सर्वांनी आपल्या सोसायटीमध्ये, शाळेमध्ये, हॉस्पिटल परिसरामध्ये किंवा जिथे मोकळी जागा मिळेल तिथे वृक्षारोपण करायला हवे.

 यावेळी ग्रीनफन फौंडेशनचे अध्यक्ष हणमंत दडस, संचालक अमोल बावस्कर व अनुराग चतुर्वेदी तसेच मैदान कर्मचारी आणि इतर संस्थेचे सभासद उपस्थित होते.