+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule23 Aug 23 person by visibility 209 categoryआरोग्य

कोल्हापूर : (आवाज इंडिया)
इन्फेक्शनवर जास्तीत जास्त काबू मिळवण्यासाठी आता वारणा हॉस्पिटलमध्ये प्लास्मास्टेराड हे अत्याधुनिक उपकरण उपलब्ध झाले आहे. ऑपरेशन करताना लागणाऱ्या सर्व उपकरणांचे यात १००% निर्जंतुकीकरण होते. त्यामुळे ऑपरेशन नंतर होणाऱ्या इन्फेक्शनचे प्रमाण खूप प्रमाणात कमी होते. रुग्ण लवकर आणि निरोगी अवस्थेत घरी जाऊ शकतात त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. राजीव कोरे व डॉ. कांचन कोरे यांनी केले आहे.


पंधरा वर्षे सातत्याने कौशल्य, गुणवत्ता आणि रुग्णसेवेचे व्रत यांच्या जोरावर वारणा युरॉलॉजी हॉस्पिटलने प्रगतीचे अनेक टप्पे गाठले आहेत. अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. स्ट्रिक्चर युरेशा (मूत्रमार्गातील व्रण) या रोगावरील अत्यंत कठीण अशा शस्त्रक्रिया करणारे पश्चिम महाराष्ट्रातील वारणा हॉस्पिटल हे एक मोठे सेंटर आहे. तर स्त्रियांमध्ये याच रोगाच्या सर्वात जास्त शस्त्रक्रिया करणारे हे एकमेव सेंटर आहे. 
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तसेच अनेक नामांकित इन्शुरन्स कंपनी बरोबर वारणा हॉस्पिटल संलग्न आहे. डॉ. राजीव कोरे यांनी इंग्लंड अमेरिका, आफ्रिका येथील नावाजलेल्या सेंटर्समध्ये हे सर्व प्रशिक्षण घेतले आहे व रुग्णांना त्याचाच फायदा होत आहे. परंतु ऑपरेशन कितीही यशस्वीरित्या केले तरी सर्जनना भेडसावणारा एक प्रश्न म्हणजे इन्फेक्शन म्हणजेच जंतुसंसर्ग. हा जंतुसंसर्ग ऑपरेशन थिएटरमधील उपकरणांचे निर्जंतुकीकरण, रुग्णांची प्रतिकारशक्ती व रुग्णाच्या शरीरात असणारे जुने इन्फेक्शन यावर अवलंबून असतो. या इन्फेक्शनवर जास्तीत जास्त काबू मिळवण्यासाठी आता वारणा हॉस्पिटलमध्ये प्लास्मास्टेराड हे अत्याधुनिक उपकरण उपलब्ध झाले आहे. ऑपरेशन करताना लागणाऱ्या सर्व उपकरणांचे यात १००% निर्जंतुकीकरण होते. त्यामुळे ऑपरेशन नंतर होणाऱ्या इन्फेक्शनचे प्रमाण खूप प्रमाणात कमी होते. रुग्ण लवकर आणि निरोगी अवस्थेत घरी जाऊ शकतात त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. राजीव कोरे व डॉ. कांचन कोरे यांनी केले आहे.