Awaj India
Register
Breaking : bolt
आर्किटेक्चर नंतर करिअरच्या* *अमर्याद संधी - डॉ. ए. के. गुप्ता*नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवड

जाहिरात

 

पूनम गिरीश मट्टिकल्ली यांना यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार'

schedule06 Mar 25 person by visibility 274 categoryराजकीय

 
कोल्हापूर
 
इचलकरंजी येथील पूनम गिरीश मट्टिकल्ली यांना कृती फाउंडेशन यांच्यावतीने यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार' जाहीर करण्यात आला. ८ मार्च रोजी स्मारक भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे.
 
नृत्य दिग्दर्शिका, शिक्षिका संगम इलेक्ट्रिकल्स या दुकानांमध्ये समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या युवक महोत्सवामध्ये सलग दोन वर्ष समूह नृत्य प्रथम पारितोषिक. तसेच शिवाजी विद्यापीठाचे नेतृत्व करण्याचा बहुमान नागपूर येथे पश्चिम विभागीय महोत्सवामध्ये मिळाला त्यामध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक तसेच मनोरंजन मंडळ इचलकरंजी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या युवा स्पंदन स्पर्धेत सलग तीन वर्ष प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
२५ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या लिमका बुक ऑफ होल्डर या नृत्य चक्र कार्यक्रमामध्ये १२०० मुलींचा सहभाग असलेल्या कथक नृत्यचक्र कार्यक्रमात सहभाग व त्यामध्ये नामांकन , व लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. रोटरी क्लब इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने बेळगाव येथे झालेल्या ४ राज्यांच्या सहभाग असलेल्यामध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केले आहे. सातारा येथे महाशिवरात्री निमित्त झालेल्या नटराज मंदिर येथे निमंत्रित कार्यक्रमांमध्ये सहभाग
सलग २५ वर्ष मनोरंजन मंडळ निर्मित कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त मराठी दिन उत्सवामध्ये सातत्याने सहभाग. वर्ष २०२२ मध्ये निर्मिती मंच आयोजित स्पर्धेमध्ये मिसेस इचलकरंजी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक , वर्ष २०२४ मध्ये लोकमत सखी इचलकरंजी श्रावण राणी स्पर्धेत, श्रावण सखी महाराणी म्हणून विजेतेपद, महिला महोत्सव कार्यक्रमांमध्ये केक मेकिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक.सध्या शास्त्रीय नृत्याचे शिक्षणामध्ये विशारद पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.अनेक नृत्य तसेच वेशभूषा स्पर्धांचे परीक्षण केले आहे.
दिव्यांग मुलांच्या विषयी कार्य केले आहे त्यामध्ये त्यांचे आरोग्य शिबिर तसेच त्यांची नृत्य गायन बसविणे कोरोना काळामध्ये अनेक संस्थांना अनेक गोष्टींना सहकार्य. महापुराच्या काळामध्ये इचलकरंजीतील पूरग्रस्तांना स्वतःच्या घरी राहण्याची सोयही उपलब्ध करून दिली आहे. समाजातील अनेक महिलांना शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती व मार्गदर्शन.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात येत आहे.
 
 
 
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes