+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule07 Feb 20 person by visibility 3106 categoryशैक्षणिकशैक्षणिक
कोल्हापूर -
 प्रा . विठ्ठल मारुती पाटील यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड यांचे कडून भूगोल विषयातील लोकसंख्याविषयक अभ्यासांतर्गत , " ए डेमोग्राफिकल स्टडी ऑफ कोळी महादेव ट्रायबल कम्युनिटी इन चंदगड तहसील ऑफ कोल्हापूर डिस्ट्रीक ( महाराष्ट्र ) ” या विषयातील संशोधनासाठी पीएच . डी . पदवी प्रदान करण्यात आली . त्यांचे वडील   मारुती हुवांना पाटील हे प्रादेशिक परिवहन कार्यालय , कोल्हापूर येथून स्केल ऑपरेटर या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत तर आई सौ . सुवर्णा पाटील या गृहिणी आहेत . त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद कॉलेज कोल्हापूर , डॉ . डी . वाय . पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालय कोल्हापूर , विद्याप्रतिष्ठानचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय बारामती , शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब , राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर तसेच महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर ( संशोधन केंद्र ) येथून पूर्ण केले आहे . महाराष्ट्रातील महादेव कोळी - १९५५ डॉ . जी . एस . घुर्ये व सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी - १९७४ डॉ . गोविंद गारे यांच्या अर्धवट व अपुरया माहितीच्या आधारे संशोधित पीएच . डी . शोधप्रबंधाना प्रा . विठ्ठल मारुती पाटील यांच्या पीएच . डी . शोधप्रबंधामुळे छेद मिळाला आहे . यामुळे सह्याद्री पट्ट्यात राहणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील खन्या आदिवासी महादेव कोळी , डोंगर कोळी जमातीच्या सह अस्तित्वावर प्रकाश पडला असून महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास योजना भविष्यात राबविणेसाठी हा पीएच . डी . शोधप्रबंध पथदर्शी ठरणार आहे . हा प्रबंध पूर्णत्वास येण्यास मार्गदर्शक प्रा . डॉ . ए . के . हांगे , माजी प्राचार्य डॉ . बी . जी . सोनावणे , महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आर . एम . लखादिवे , भूगोल संशोधन केंद्राचे प्रमुख तथा विभाग प्रमुख प्रा . डॉ . एन . जी . माळी , प्राचार्य , वि . एस . अनिगुंठे , प्रा . डॉ . ओ . वि . शहापूरकर , प्रा . डॉ . एच . एस . वाघमारे , प्रा . डॉ . डी . सी . कांबळे , प्रा . एच . पी . पाटील , प्रा . पुनश्री फडणीस , प्रा . बसवंत पाटील , श्री . वाय . बी . पाटील व श्री . बी . एस . गुरव यांचे मार्गदर्शन मिळाले . तसेच त्यांना पीएच . डी . शोधप्रबंधासाठी आई - वडील , सहकारी प्राध्यापक , मित्र - परिवार व ग्रामस्थ यांची मोलाची साथ मिळाली . पश्चिम महाराष्ट्रातील आदिवासी महादेव कोळी जमातीवर संशोधन करणारे प्रा . विठठल मारुती पाटील हे पहिलेच पीएच . डी . संशोधक ( पीएच . डी . धारक ) आहेत .