+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमहाराज जरा लक्ष ठेवा, नाहीतर वटमुखत्यार वाड्यावर नाव लावतील adjustचेतन’ यांचे व्हीजन घेऊनच कोल्हापूरचा विकास करणार ; शाहू छत्रपती adjustपोर्ले येथे सभेत सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन adjustगद्दार खासदाराला कायमचे घरी बसवा adjustसतेज पाटील यांच्या सुडाच्या राजकारणाला कंटाळून भाजपप्रवेश ; नेर्लीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश पुजारी adjustआमच्या विरोधकांनी आता किमान अजिंक्यतारा वरून येणारी स्क्रिप्ट तरी बदलावी adjustविकासकामांच्या आडवे याल तर याद राखा ; कसबा बावड्याचा विकास हेच शिवसेनेचे ध्येय adjustमंडलिक यांनी 27 पैसे तरी कोणाला देऊन माहिती आहेत का? adjustजनतेला फसवत विश्वासघात, गद्दारी करणाऱ्या संजय मंडलिकांना पराभूत करा adjustपाच वर्षे निष्क्रिय राहिलेल्या खासदाराचा करेक्ट कार्यक्रम करा
schedule12 Jan 23 person by visibility 104 categoryराजकीय


कोल्हापूर आवाज इंडिया

कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीची इमारतीचा वापर माजी संचालकानी लॉजिंग - बोर्डिंगसारखा केला. आता तेच लोक उलटा कांगावा करत आहेत."असा हल्लाबोल सोसायटीचे विद्यमान चेअरमन राजीव परीट यांनी केला.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचारी सहकारी सोसायटीच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी सहकार सत्तारुढ पॅनेलने हातकणंगले, शिरोळ करवीर तालुक्यात प्रचार दौरा केला.

 या प्रचार दौऱ्यात बोलताना चेअरमन राजीव परीट म्हणाले, "या निवडणुकीत विरोधक सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सभासद सूज्ञ आहेत. सत्तारूढ पॅनेलने केलेला सभासदाभिमुख कारभार सभासदांच्या पसंतीस उतरला आहे. सोसायटीची इमारत हे आमचे व सभासदांचे दैवत आहे. तुझे पावित्र्य कोणत्याही प्रकारे नष्ट होणार नाही. विरोधक करत असलेल्या बिन बुडाच्या आरोपांना सभासदच मताच्या माध्यमातून उत्तर देतील."

  जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान संचालक महावीर सोळांकुरे म्हणाले,"गडहिंगलज शाखेतील कामकाजावरून विरोधक चुकीचे आरोप करत आहेत. गड इंग्रज शाखेतील मॅनेजर हे कौटुंबिक कारणास्तव परस्पर रजा पाठवून रजेवर गेले होते. त्यावेळी संस्थेच्या शाखेत ३५ लाख ७६ हजार शिल्लक असलेले निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र ते भेटले नाहीत याबाबत परिसर नोटीसा दिल्या. अंतिमत: फौजदारी गुन्हा दाखल कराचे ठरल्यावर त्या शाखा मॅनेजरच्या नातेवाईकांनी त्याला संस्थेत हजर केले. तेव्हा त्याच्याकडून लोकर मधून असलेले सर्व शिल्लक रक्कम घेतली. त्या 28 दिवसाचे व्याज ही जमा करून घेतले. त्या शाखा मॅनेजरची मुख्यालय तात्काळ बदली केली व तीन पगारवाढ रोखल्या. "

याप्रसंगी अजित मगदूम यांचे भाषण झाले. संस्थेचा कारभार उत्तम पद्धतीने सुरू आहे. विरोधकांनी नाहक आरोप करू नयेत. अभ्यास करून टीकाटिप्पणी करावी." असे मगदूम म्हणाले. यावेळी के.आर.किरुळकर यांचे भाषण झाले. प्रचार दौऱ्यात श्री महालक्ष्मी सहकार सत्तारुढ पॅनेलचे सगळे उमेदवार उपस्थित होते.