राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक
schedule18 Aug 22 person by visibility 220 categoryलाइफस्टाइल
असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
दिल्ली : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याच सांगण्यात येत आहे.जिममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला.10ऑगस्ट पासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ताज्या मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.हृदयविकाराचा झटका आल्यापासून ते बेशुद्धच आहेत.काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होती.मात्र आता परत त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती मिळत आहे.
राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका कसा आला ?
10ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआऊट करीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ट्रेड मिलवर व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांना अचानक छातीत दुखू लागल्याने ते खाली कोसळले.नंतर त्यांना एम्स मध्ये दाखल करण्यात आले. सध्या ते एम्समध्ये व्हेंटिलेटरवर आहेत.
पंतप्रधान मोदी,राजनाथ सिंह ,योगी आदित्यनाथ यांच्याकडूनही मदतीचं आश्वासन -
राजू यांना लहानपणापासूनच विनोदाची आवड होती.त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ' टी टाईम मनोरंजन ' या टीव्ही शोमधून केली. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ' या शो मधून त्यांना खरी ओळख मिळाली .या शो मध्ये त्यांनी आपल्या यूपी अंदाजाने लोकांना भरभरून हसवलं.
पंतप्रधान मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला फोन करून तब्बेतीची विचारपूस केली आणि मदतीचं आश्वासन दिलं.यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली होती.त्यांनीही मदतीचे आश्वासन दिले आहे.