+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule13 May 23 person by visibility 151 categoryराजकीय
कोल्हापूर दि.१३ : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात शिवसेनेची भक्कम बांधणी होत आहे. मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी लोकहिताच्या निर्णयाचा धडाका लावला असून, त्याचे जनतेतून स्वागत होत आहे. युवा वर्गाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना अंगीकृत युवा सेनेची स्थापना शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली. युवा वर्गाचे रोजगार, शिक्षणाशी निगडीत प्रश्नाला वाचा फोडून युवा वर्गाला न्याय देण्याचे काम युवासेनेच्या वतीने करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचा विस्तार होत असताना, युवासेनेच्या माध्यमातून युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी युवासेना कार्यकारणीचा विस्तार करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात युवकांचे प्रश्न सातत्याने मांडणाऱ्या आणि सामाजिक कार्याच्या जोरावर युवकांचे नेतृत्व बनलेल्या श्री.ऋतुराज राजेश क्षीरसागर यांची युवासेनेच्या कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघाच्या "अध्यक्ष" पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्यनेते व राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना सचिव श्री.भाऊ चौधरी, शिवसेना सचिव श्री.सिद्धेश कदम यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून युवासेना लोकसभा अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या केल्या आहेत.    

            युवासेना कोल्हापूर, हातकणंगलेच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झालेले श्री.ऋतुराज क्षीरसागर हे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, मित्र संस्थेचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्न समिती सदस्य आणि शिवसेना सातारा, सांगली लोकसभा संपर्कप्रमुख श्री.राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. गेली १२ वर्षे युवा सेना, नो मर्सी ग्रुप या माध्यमातून ते युवकांचे नेतृत्व करत आहेत. विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया, डोनेशन विरोधी मोर्चा, रोजगाराचे प्रश्न यासह शाळा- महाविद्यालयांवर आरोग्य शिबिरे, मैत्रीयुवा महोत्सवाच्या माध्यमातून व्यसन मुक्ती संदेश अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून श्री.ऋतुराज क्षीरसागर यांनी युवा वर्गात आपली स्वतंत्र छाप पाडली आहे. आगामी काळात युवा रोजगार निर्मिती, शाळा- कॉलेज प्रवेश प्रक्रिया, क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या दोन्ही मतदार संघात युवा वर्गाची संघटनात्मक बांधणी करून युवकांचे जाळे निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. यातून शिवसेनेचे दोन्ही मतदारसंघात प्राबल्य वाढविण्यास मदत होणार आहे.


*पक्षनेतृत्वाच्या विश्वासास सार्थ काम करून, दोन्ही मतदारसंघात शिवसेना - युवासेनेचे प्राबल्य वाढविणार* : *श्री.ऋतुराज क्षीरसागर*

            गेली ३७ वर्षे आमचे कुटुंब शिवसेनेशी एकनिष्ठ असून, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी मार्गक्रमण करत आहे. याचीच पोहच पावती म्हणून माझे वडील श्री.राजेश क्षीरसागर यांच्यावर विविध शासकीय पदांसह पक्षीय पातळीवरील महत्वाच्या पदांची जबाबदारी देण्यात आली आहे. आमच्या कुटुंबांवर पक्षनेतृत्वाचा असणाऱ्या विश्वासास तडा जावू न देता कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात युवकांचे जाळे निर्माण करून शिवसेना - युवासेनेचे प्राबल्य वाढविणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त युवा सेना कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा अध्यक्ष श्री.ऋतुराज क्षीरसागर यांनी केले.