संजय पवार टक्केवारी व तोडपाणी स्पेशालीस्ट : शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव
schedule03 Jun 23 person by visibility 419 category

कोल्हापूर दि.०२ : ज्यांचे उभे आयुष्य आंदोलनातील टक्केवारी आणि तोडपाणीत निघून गेले अशा संजय पवार यांना कोल्हापुरात सुरु असलेल्या विकास कामांबाबत पोटशूळ उठले आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याचा होणारा विकास त्यांच्या डोळ्यात खुपत असून, कोल्हापूरच्या जनतेमध्ये संभ्रम पसरविण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे. परंतु, कोल्हापूरची जनता सुजाण असून, तोडपाणी व टक्केवारी स्पेशालीस्ट संजय पवार यांच्या या केविलवाण्या प्रयत्नांना भिक घालणार नाही. संजय पवार यांनी आगामी काळात शिवसेना - भाजप युती व लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांचेवरचे खोटे आरोप थांबवावेत, अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर देण्यास आम्ही शिवसैनिक सज्ज आहोत, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी दिला आहे.
"संजय पवार यांचा खरा चेहरा" या मथळ्याखाली दैनिक सकाळ या वृत्तपत्राने स्थायी समिती सभापती निवडणुकीत संजय पवार यांनी तोडपाणी करून घोडेबाजार केल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. यासह संजय पवार यांनी केलेल्या आंदोलनात तोडपाणी आणि टक्केवारीची प्रक्रिया राबविल्याने त्यात ते स्पेशालीस्ट बनले आहेत. ही गोष्ठ त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि पक्षातील सर्वांनाच माहित आहे. उद्योग भवन आवारातील एका कार्यालयातून महिन्याचे हप्त्याचे पाकीट कोण घेत? हे सगळ्या जनतेला माहित आहे. आंदोलनातील तोडपाण्यातून खुदगब्बर होणाऱ्या संजय पवार यांना शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाही. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या धनुष्यबाण व उमेदवारा विरोधात नेहमीच प्रचार करून, विरोधकांकडून प्रत्येक निवडणुकीत टक्केवारीचे गणित जुळवणारे संजय पवार यांना टक्केवारी झोपेतही दिसते. त्याचमुळे कदाचित कोल्हापूरच्या विकास कामातही ते टक्केवारीचे खोटे आरोप करत सुटले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब, उप-मुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिवसेना भाजप युतीचे सर्वच सहकारी, मंत्री राज्याच्या विकासासाठी दिवसरात्र झटत आहे. कोल्हापूरच्या इतिहासात कोल्हापूर जिल्ह्याला जेवढा निधी मिळाला नाही तो मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी दिला आहे. याउलट महाविकास आघाडी किंवा तत्कालीन कॉंग्रेस - राष्ट्रवादीचे सरकार विकास कामात अपयशी ठरले. ही नाचक्की समोर दिसत असल्याने संजय पवार यांना पोटशूळ उठले आहे. त्याचमुळे ते कोल्हापूर जिल्ह्यास व शहरास मिळालेल्या निधी बाबत खोटे आरोप करत आहे. याचाच प्रत्यय म्हणजे गेल्या काही दिवसात जिल्हा नियोजन समिती सदस्यांवरही त्यांनी ही खोटे आरोप केले. पुढील काळात सेटलमेंट किंग संजय पवार यांनी खोटे आरोप बंद करावेत, अन्यथा शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकांशी गाठ असल्याचा इशारा त्यांनी दिला.