Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये बजाज कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न डॉ. सुनील जे. रायकर यांचे 3डी प्रिंटिंगवर व्याख्यानचंदगड तालुक्यात विहिरीचे पैसे पाण्यातहोय, मी भांडी घासतोय!पोपट पवार,सर्जेराव नावले,शेखर पाटील,आदित्य वेल्हाळ,सचिन सावंत, नयन यादवाड यांना कोल्हापूर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीरडॉ. कोडोलीकर यांना धम्मविचार साहित्य गौरव पुरस्कार जाहीरडी. वाय. पाटील विद्यापीठात* *सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*सबका मंगल हो रूपाली पाटीलडी. वाय. पाटील मेडिकल संघाला विजेतेपदसतेज कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तुफान तुडुंब गर्दी*

जाहिरात

 

गांधीनगरचे सरपंच पाटोळे यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश

schedule06 Aug 24 person by visibility 463 category


कोल्हापूर ;
    2-3 दिवसांपूर्वी गांधीनगर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्याने सतेज पाटील गटात प्रवेश केला. प्रवेश करण्यापर्यंत ठीक आहे, आम्ही काही बोललो नाही, पण त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी डीएससी च्या कामाचं श्रेय घेण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पत्रकार परिषदेत रितु हरेश लालवानी,लक्ष्मी अशोक घमिया, रिना अभिजीत अवघडे, सरिता राजकुमार कटेजा, रवि मोतिलाल मालानी,दिपक जमनाती यांनी दिली.

सरपंच झाल्यापासून संदीप पाटोळेंनी भ्रष्टाचार आणि गैरकृत्यांच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते जुमानत नव्हते. आपल्याच गटाचा आम्हीच आमच्या पायावर मारून घेतलेला दगड असल्याने आमचीही अडचण झाली होती. अशी टीकाही यावेळी सरपंच यांच्यावर करण्यात आली.

       या संघर्षातून पाटोळे यांनी 1 वर्षानंतर झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये नेत्यांचा आदेश डावलून आ. सतेज पाटील गटाला मदत केली. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी तेव्हापासून सतेज पाटील गटाची कास धरली. त्याची पुढची पावलं ओळखून आम्ही त्यानंतर मात्र सरपंचांच्या गैरकारभाराच्या विरोधात रीतसर कारवाईची मागणी करत कायदेशीर मार्ग अवलंबला. यामधून आपले पद जाणार यांची जाणिव त्यांना आधीच लागली होती. पण विरोधी गटात जाताना स्वतःच्या भ्रष्टाचाराचं कार सांगून जाऊ शकत नाही म्हणून ते योग्य संधीची वाट बघत होते. 

        ती संधी त्यांना मागच्या आठवड्यात पाटोळे यांना मिळाली. गांधीनगरला महसुली गावाचा दर्जा प्राप्त व्हावा आणि ग्रामपंचायतीचे डीएससी ऍक्टिव्ह करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक, अमल साहेब, शौमिका वहिनी गेले वर्षभर प्रयत्न करत आहेत. हे काम आता होणार या संधीचा फायदा घेऊन काठावर तिकडं प्रवेश केला. सतेज पाटील यानी केलं म्हणून मी इकडे गेली असं धडधडीत खोटं सांगून लोकांची दिशाभूल केली गेली. 

एकीकडे सतेज पाटील म्हणतात सरकार आम्हाला सहकार्य करत नाही, दिल्लीत त्यांचे नेते म्हणतात सरकार सहकार्य करत नाही आणि दुसरीकडे पाटोळे म्हणतात एका आठवड्यात दिल्ली, मुंबई सगळ्या परवानग्या त्यांच्या नव्या नेत्यानी आणल्या. लहान मुलाला तरी हे पटेल का ? आयत्या पिठावर रांगोळ्या ओढण्याचा हा प्रकार आहे. असल्याची टिका ही यावेळी करण्यात आली.

      खरं पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त स्वतःच्या भ्रष्टाचारावर पांघरून टाकण्यासाठी आणि स्वार्थासाठी त्यांनी विरोधी गटात प्रवेश केलेला आहे. त्यांना सरपंच करण्यासाठी आम्ही पूर्व कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. आमच्या सिंधी समाजाने त्यांच्यावर विश्वास टाकला. त्यांनी आम्हा सर्व भाजपा कार्यकत्यांचा आणि सिंधी समाजाचा विश्वासघात केलेला आहे. यासाठी आम्ही त्यांना माफ करणार नाही. आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणल्याशिवाय शांत बसणार नाही. गद्दारांना त्यांची जागा समजलीच पाहिजे, ही आमची भूमिका आहे.



 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes