+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात प्रमुख नेत्याची लोकसभेच्या रिंगणातून माघार adjustदिल्लीच्या संसदेत कोल्हापूरचे शाहूच adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द
schedule20 Aug 22 person by visibility 282 categoryउद्योग
असित बनगे: आवाज इंडिया प्रतिनिधी

 बुधवारी रेसिडेन्सी क्लबमध्ये होणार वितरण समारंभ



 कोल्हापूर : कोल्हापूरचे नाव उंचीवर नेण्यासाठी कार्यरत असणाऱ्या उद्योजकांना सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट च्यावतीने कोल्हापूर उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते यावर्षी या पुरस्काराचे सहावे पर्व असून यावर्षीचा पुरस्कार मयुरा स्टीलचे चेअरमन चंद्रशेखर डोली यांना जाहीर केला असल्याची माहिती सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे कोल्हापूर विभाग प्रमुख विशाल मंडलिक यांनी दिली. 


 ते म्हणाले, बुधवारी (ता.२४) रोजी दुपारी चार वाजता रेसिडेन्सी क्लब येथे हा कार्यक्रम होणार असून हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी अणूशास्त्रज्ञ,ज्येष्ठ उद्योजक,सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर सुरेश हावरे उपस्थितीत राहणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर अजित मराठे असणार आहेत.तर डेप्युटी सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. क्लबच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत असून गेली सहा वर्षे सातत्याने आम्ही हा पुरस्कार देत आहे. मयुरा स्टीलच्या माध्यमातून काम करत असताना श्री. चंद्रशेखर डोली यांनी कोल्हापूरला आर्थिक, सामाजिक क्षेत्रात वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. 


 उपविभाग प्रमुख निलेश पाटील यांनी सांगितले की या पुरस्काराची निवड कोल्हापूरातील विविध अकरा संघटनेतून एक निवड समिती करत असते याचा आम्हाला अभिमान आहे. आतापर्यंत आपण स्व. राम मेनन यांना जीवन गौरव पुरस्काराने आणि आजपर्यंत स्व. राम प्रताप झंवर,किरण पाटील,व्ही एन देशपांडे, बाबाभाई वसा,माधवराव घाटगे या ज्येष्ठ उद्योजकांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित केले असून यांचा गौरव करण्यासाठी दुबईचे मसाला किंग धनंजय दातार, चितळे डेअरीचे गिरीश चितळे,पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई आणि घोडावत उद्योग समूहाचे संजय घोडावत यांनी उपस्थिती लावली आहे. 

 कोल्हापूर चॅप्टरचे चेअरमन पिराजी पाटील यांनी हा पुरस्कार सोहळयामध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असल्याचे सांगितले तसेच याचे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या फेसबुक पेजवरून थेट प्रसारण करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

 यावेळी सचिव सिद्धेश मोहिते, खजानीस पूनम शहा,विशाल मंडलिक,निलेश पाटील,पिराजी पाटील उपस्थित होते.