+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात रंगणार "लोकनाथ चषक" भव्य क्रिकेट स्पर्धेचा थरार adjust कुंभी कासारी आणि नरके पॅनल याची विश्वासार्हताच पॅनलला विजयी करेल adjustसभासदांच्या विश्वासामुळे नरके पॅनलच्या विजय निश्चित adjust**कोल्हापुरात 2 फेब्रुवारीला "संघर्ष" राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा adjust भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस पाटलाला मारहाण adjustपशुसंवर्धन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये महत्वपूर्ण बदल आणि अनुदानात भरघोस वाढ. adjustरोटरी क्लब ऑफ करवीर च्या वतीने अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महोत्सवाचे आयोजन adjust.. कोल्हापुरातील मटका पोलिसांच्या ब्रँडच्या काळ्या गॉगल मधून दिसणार काय adjustपश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे *भीमा कृषी प्रदर्शन २०२३* या प्रदर्शनास आजपासून होणार प्रारंभ adjustइंडियन डेअरी फेस्टिवलचे शुक्रवारी उद्घाटन
schedule29 May 20 person by visibility 4383 categoryगुन्हे
फडणीस सहस्त्रबुद्धे अष्टेकर अटकेत
कोल्हापूर / प्रतिनिधी
आपल्या मुखातून प्रत्यक्ष स्वामी व साईबाबा बोलतात, असे भासवून संदिप प्रकाश नंदगांवकर (वय - ३८, रा. देवकर पाणंद) व त्यांची पत्नी स्वाती नंदगांवकर या भक्तांकडून फ्लॅट, मठ व कसबा तारळे (ता.राधानगरी) येथील गोशाळेसाठी तब्बल ३५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची फिर्याद पीडित संदीप नंदगांवकर यांनी राजवाडा पोलिसात दिली. या प्रकरणी भोंदूबाबा प्रविण विजय फडणीस (वय ४४, रा. मंगळवार पेठ), त्याचा गुरू श्रीधर नारायण सहस्त्रबुध्दे (वय- ५५,रा. फुलेवाडी) व त्यांची साथीदार सविता अनिल अष्टेकर ( रा. मंगळवार पेठ) या तिघांना राजवाडा पोलीसांनी मध्यरात्री अटक केली. तसेच नंदगांवकर यांनी दिलेल्या फिर्यादीत अन्य भक्तांकडून 3 कोटी 96 लाख 34 हजार 490 रुपयांची फसवणूक केल्याचीही तक्रार दिली आहे.
याप्रकरणी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू बाबा फडणीस व सहस्रबुद्धे यांचा मंगळवार पेठ येथे मठ आहे. या मठात फिर्यादी नंदगांवकर, त्याची पत्नी व भाऊ दर्शनासाठी कधी कधी जात होते. त्यांना नित्यनेमाने येण्यासाठी भोंदूबाबा फडणीस यांनी सांगितले. नियमितपणे जाणे सुरू झाल्यावर नंदगावकर व त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला.
सन २०१३ ते दि. २९ मे २०२० पर्यंत भोंदू बाबा फडणीस याने त्याचा गुरु श्रीधर सहस्त्रबुध्दे यांनी त्यांची साथीदार सविता अष्टेकर हिच्या मदतीने, फडणीस यांच्या अंगात स्वामीचा संचार होतो, स्वामीची ताकत त्यांच्यामध्ये येते, असे भासविले. तसेच श्रीधर सहस्त्रबुध्दे यांच्यात साईबाबांचा संचार होवुन त्यांच्या मुखातून साईबाबाच बोलतात, असे सांगुन पटवून दिले.
त्यांनतर नंदगांवकर कुटुंबाचा विश्वासघात करुन त्यांच्याकडुन वेळोवळी ३५ लाख रुपये इतकी रोख रक्कम घेतली. तसेच
फिर्यादीने आपला भाऊ प्रविण प्रकाश नंदगावकर यांचेकडुन ही मोठी रक्कम घेतल्याचे व त्यासोबतच ओंकार किशोर बाजी, मंदार शिरीष दिक्षीत, रेणुका अरविंद चिंगरे, श्रीमती विद्या गिरीष दिक्षीत, केदार शिरीष दिक्षीत, रुपा किशोर बाजी, श्रीमती दिपा नारायण बाजी, शहाजी हिन्दुराव पाटील, गोविंद लक्ष्मण जोशी, मिनाक्षी मिलींद करी, एकता जयंत जोशी, जयंत मानव जोशी या भक्तांचीही अशाच प्रकारे अर्थिक फसवणुक करुन या सर्वांना 3 कोटी 96 लाख इतक्या मोठ्या रक्कमेची फसवणूक करून लुबाडले असल्याचे नंदगवकरांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या फसवणुकीविरोधात नंदगांवकर यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच काल मध्यरात्रीच पोलीसांनी कारवाई करत या तिघा भामट्या भोंदूबाबांना अटक केली व शुक्रवारी सकाळी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिकचा तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश पाटील हे करत आहेत.