+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द adjustदेशात भाजपचा हुकूमशाही कारभार ;सौरभ खेडेकर यांची टीका adjustशाहू छत्रपती यांची रंगपंचमी; संभाजी राजे यांची जूनची हमी adjustगोकुळ’ च्या कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे
schedule30 Jun 20 person by visibility 2921 categoryसंपादकीय
कोल्हापूर : महाराष्ट्रातील प्रतिथयश दैनिकांत काम केलेले अभ्यासू पत्रकार आवाज इंडियामध्ये रुजू झाले आहेत. त्यांचे आमच्या टीममध्ये हार्दिक स्वागत ! दीर्घकाळ काम केलेल्या या ज्येष्ठ पत्रकारांच्या अभ्यासूवृत्तीचा लाभ आमच्या असंख्य व्ह्यूअर्सना घेता येणार आहे. गुन्हेगारी, शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था, रेल्वे, एसटी आणि विमानसेवा या क्षेत्राचा दांडगा अनुभव असलेले सचिन यादव, शहराचे सांस्कृतिक विश्व, महिलांच्या प्रश्नांच्या अभ्यासक आणि लालित्यपूर्ण शैलीने आपला असा स्वतंत्र वाचक निर्माण करणाऱ्या अनुराधा कदम, महापालिका, नागरी प्रश्न आणि कृषी अभ्यासक एम. डी. पाटील अशी भरभक्कम टीम आता आवाज इंडिया व्यवस्थापन मंडळासोबत असणार आहे. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे आवाज इंडियाच्या लौकिकांत भर पडणार आहे.
सचिन यादव यांनी गेल्या वीस वर्षाच्या पत्रकारितेत विविध प्रश्न हाताळले आहेत. पुढारी, सकाळ आणि महाराष्ट्र टाइम्स अशा प्रथितयश दैनिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. सकाळमध्ये २००० पासून विद्यार्थी बातमीदार म्हणून पत्रकारितेची सुरूवात केलेल्या यादव यांनी सात वर्षे विविध बीटचे वार्तांकन यशस्वीरित्या केले. त्यानंतर २००७ ते २०१२ अखेर पुढारीमध्ये वरिष्ठ बातमीदार म्हणून काम केले. जुलै २०१२ ते २०२० अशी आठ वर्षे टाइम्स ग्रुपच्या महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीत प्रिन्सिपल करस्पाँडन्स म्हणून काम पाहिले . या आठ वर्षाच्या काळात त्यांनी पत्रकारितेची सर्व अंगे हाताळली आहेत. विशेषत: शिक्षण, आरोग्य, जिल्हा परिषद, महापालिका, गुन्हेगारी, राजकीय, उद्योग, व्यापार आणि वाहतूक व्यवस्थेतील प्रश्न हाताळले. त्यांच्या अनेक बातम्यांचा सकारात्मक परिणाम झाला. प्रशासनाला त्यांच्या बातम्यांची दखल घेऊन धोरणात्मक निर्णय घ्यावे लागले.
अनुराधा कदम याही एक हरहुन्नरी पत्रकार आहेत. त्यांच्या पत्रकारितेची सुरूवात १९९९ पासून दैनिक तरूण भारतच्या कोल्हापूर आवृत्तीतून झाली. त्यानंतर पुढारी आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी काम केले. शालेय ते उच्च शिक्षण, महिलांचे प्रश्न, सांस्कृतिक, राजकीय या क्षेत्रांशी संबंधित त्यांच्या अनेक बातम्या चर्चेच्या ठरल्या. शोधपत्रकारितेबरोबरच मुलाखती आणि विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेख आणि लालित्यपूर्ण शैलीच्या माध्यमातून त्यांनी स्वत:चा वाचक निर्माण केला आहे. सक्षम मी या विशेष वृत्त मालिकेसाठी महाराष्ट्रातील २० निवडक महिलांच्या मुलाखतीसाठी त्यांनी लेखन केले आहे.
वृद्ध कलाकारांच्या मानधनाचा रखडलेला प्रश्न, विभागीय उच्चशिक्षण कार्यालयातील भ्रष्टाचार, महापालिकेतील महिला नेतृत्वाची घुसमट, उद्योग व्यापारातील तरूणाईचे प्रयोग, महिलांवरील अत्याचार या विषयांवरील त्यांच्या बातम्यांची दखल प्रशासनाला दखल घ्यावी लागली. त्यांच्या या पत्रकारितेची दखल अनेक संस्थांनी घेतली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार, कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, बेळगावच्या शतकमहोत्सवी वाचनालयातर्फे नाथ पै पुरस्कारासाठी त्यांची चार वेळा निवड झाली.
एम. डी. पाटील यांनी शेती आणि सहकार हे विषय बातम्यांच्या माध्यमातून चर्चेला आणले. गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ ते या क्षेत्रांत आहेत. दैनिक पुढारीमध्ये बातमीदार, तरुण भारतमध्ये संपादन, प्रादेशिक आणि क्रिडा पानाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी आतापर्यंत जिल्हा परिषद, सहकार विभाग, जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, बाजार समिती, साखर कारखानदारी, क्रीडा, शिक्षण आणि महानगरपालिकेशी संबंधित विविध विषय हाताळले आहेत. पाणी, केएमटी परिवहन आणि नागरी प्रश्न हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत