Awaj India
Register
Breaking : bolt
रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ*डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सर्वसाधारण विजेतेपद*लोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय :आमदार सतेज पाटील आनदराव पाटील चुयेकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९७%नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्केडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल ९९.१७ टक्के*मित्र-मैत्रिण नाते किती ग्रेट?निवडणुकीनंतर लाडकी बहीण राज्य सरकारला सावत्र झाली; आमदार सतेज पाटील यांची टिका...शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज ; अरुण डोंगळेशालेय आयडी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : प्रवीणभाई माणगावे

जाहिरात

 

यांना मिळाला राष्ट्रपिता ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कार

schedule02 Sep 23 person by visibility 656 category


कोल्हापूर : 
सम्यक शिक्षण विचार मंच व कृती फाउंडेशन यांच्या वतीने राष्ट्रपिता जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक, शिक्षिका पुरस्कार नुकतेच जाहीर झाले.अशी माहिती मंचचे अध्यक्ष भीमराव संघमित्रा व उपाध्यक्ष पी.आर. कांबळे यांनी प्रसिद्धीस दिली.

 पुरस्काराचे वितरण उद्या रविवारी (दि.3) राजर्षि शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे दुपारी बारा वाजता मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी जेष्ठ समीक्षक प्रा. डॉ. गिरीश मोरे यांचे व्याख्यान होणार आहे.

पुरस्कार प्राप्त विजेत्यांची नावे अशी- विद्या मंदिर सिद्धनेर्ली (ता.कागल) मुख्याध्यापक गणपती काशीराम पुजारी, सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. अनिजा सूर्यवंशी, दूध साखर महाविद्यालय बिद्रीचे प्रा. डॉ. सतीश गंगावणे, जवाहर नवोदय विद्यालय वर्धाचे सेवानिवृत्ती अजित कोठावळे,इलेक्ट्रॉनिक विभाग शिवाजी विद्यापीठातील
प्राध्यापक डॉ. मुरलीधर भानारकर, सद्गुरु गाडगे महाराज विद्यालय कोल्हापूर महानगरपालिका येथील
गीता घाटगे, दादासाहेब मगदूम ज्युनिअर कॉलेज कसबा सांगावचे एस पी दीक्षित, डीएम स्कूल ज्युनिअर कॉलेजच्या संजीवनी सावंत, प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर, प्रा. डॉ. शैलजा गवळी, शा.कृ. पंत वालवालकर हायस्कूल कात्रज येथील नितीन आर्य,झरेवाडी केंद्र शाळा रत्नागिरी येथील राजेश गोसावी, काडसिद्धेश्वर विद्यामंदिर कणेरी मंदिर
प्रवीण कांबळे, लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालय इंदिरा नगर भोसरीचे सूर्यकांत राठोड, तिळवणीच्या गौतमी सावंत,राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली तालुका हातकलणगले येथील माधुरी केळूसकर, भारती विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय घोटी बुद्रुकचे बाजीराव प्रज्ञावंत, तात्यासाहेब मुसळे बाल विद्यामंदिर इचलकरंजीचे मधुकर पाडवी,आजरा येथील अंगणवाडी सेविका सुमन कांबळे, शा. कृ पंत वालवलकर हायस्कूल येथील सौरव देसाई, पायोनियर हायस्कूल अतिग्रे तालुका हातकलंणगचे अशोक भोसले,नागपूरचे डॉ. राजेश क्षीरसागर, एन एस बी कॉलेज फलटणचे प्रा. डॉ. सतेज दणाणे, संजय घोडावत आयआयटी मेडिकल अकॅडमीचे उपप्राचार्य विवेक कांबळे, अहमदनगरचे मच्छिंद्र पाटोळे,पुष्पाताई वसगावकर, अरविंद वसगावकर, प्रा. धनपाल गवळी श्रीमती सुशीला मारुती पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैशाली पाटील हे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत‌.











जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes