Awaj India
Register
Breaking : bolt
एस. पी. दिक्षित यांना ‘महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार’ सहाय्यक प्राध्यापिका सुमन प्रभाकर कांबळे यांना महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार जाहीर महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्काराने प्राध्यापिका सौ. सुमन अक्षय कांबळे सन्मानित डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश ख्यालप्पास्नेहल सचिन घाडीगावकर यांना महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कारमहात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्काराने सौ. स्नेहल सचिन घाडीगावकर सन्मानित ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी* *डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट*डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती

जाहिरात

 

राजू शेट्टी यांच्या विरोधात शेतकरी संघटनेचे शिवाजी माने शड्डू ठोकणार

schedule10 Oct 23 person by visibility 1573 categoryराजकीय


संघटनेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त पेटवडगाव येथे मेळावा

पेठवडगाव : 
विद्यमान खासदार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरले आहे तर माजी खासदार चारशे रुपयांच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आत्मक्लेष यात्रा काढत आहेत.हे दोन्ही आजी-माजी खासदार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत यामुळेच देशाच्या सर्वोच्च सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न तीव्रतेने मांडण्यासाठी जय शिवराय शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी माने यांनी केला.
पेठ वडगाव (ता.हातकणंगले) येथील शेतकरी संघटनेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. गुजरात येथील 
गणदेवी साखर कारखान्याचे संचालक रणजीतभाई पटेल, भीमराव पाटेल, भीमराव साठे, नितीन पाटील,
बाळासाहेब पाटील,राजेंद्र सुतार, अनिल पाटील प्रमुख उपस्थितीत होते.

माने पुढे म्हणाले, ऊसाला पाच हजार शंभर रुपये मिळावे यासाठी गेले चार महिने आम्ही संघर्ष करत आलो, कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये याबाबत लोकप्रबोधन करण्याचं काम आम्ही केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील 871 तर सांगली जिल्ह्यातील 561 गावांमध्ये ग्रामसभेचे ठराव घेऊन ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले. भविष्यात महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतचे ठराव घेऊन देशाचे सहकार मंत्री व पंतप्रधान यांना पाठवणार आहे.
यावेळी गणदेवी साखर कारखान्याचे संचालक रणजीत भाई पटेल म्हणाले, आमच्या राज्यामध्ये जवळच्या एका साखर कारखाने विस्तारीकरण केले म्हणून आम्ही लगेच विस्तारित करण केले असे होत नाही एखादा छोटा कारखाना असेल तो कारखाना मोठ्या कारखान्यामध्येविलीनीकरण करून क्षमता वाढवावी हा आमचा हेतू असतो. मार्च अखेर गत हंगामात 3675 आम्ही ऊसाला दर दिला. यासाठी साखर उतारा साडेअकरा टक्के होता. साखर कारखान्याचे नियोजनही अत्यंत नेटकेपणाने झाले की उसाला दर सुद्धा चांगला दर देता येतो.
दरम्यान विनय पब्लिकेशन प्रकाशित शिवाजी माने लिखित 'तिढा शेती प्रश्नाचा' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं.
यावेळी यावेळी शामल सुतार, श्रावणी पाटील,या विद्यार्थ्यांची भाषण झाले.
स्वागत सदाशिव कुलकर्णी यांनी केले.प्रस्ताविक शितल कांबळे यांनी केले.आभार शामसुंदर जायगुडे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र खैरे यांनी केले.



जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes