कावणेतील शिवदत्त पाटील याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
schedule23 May 23 person by visibility 586 categoryआरोग्य
कोल्हापूर प्रतिनिधी
कावणे (ता. करवीर) येथील शिवदत्त मारुती पाटील (वय 23) याचा विजेच्या धक्क्याने सकाळी मृत्यू झाला. सकाळी सात वाजता निगवे खालसा (ता. करवीर) मार्गावर असणाऱ्या गोट्यात कडबा कुटी करत असताना त्याला विजेचा शॉक बसला. या शॉकने त्याचा जागीच मृत्यू झाला.
शिवदत पाटील हा सकाळी जनावरांना वैरण टाकण्यासाठी गेला होता. सकाळी साडेसात वाजता गेलेल्या मुलगा परत आला नाही म्हणून त्यांची आई यांनी दहा वाजता मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोनला प्रतिसाद मिळत नसल्याकारणाने त्या त्यांच्या गोठ्यात गेल्या. गोट्यामध्ये तो खाली पडलेला त्यांना दिसला. घडलेली घटना त्यांनी शेजाऱ्यांना सांगितली.
पाटील यांना उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातात आणले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी त्याचे पोस्टमार्टम करण्यात आले. पाटील हे ह. भ. प. एम.पी. पाटील यांचा मुलगा होता.एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांच्यासह गावावर शोककळा पसरली.
108 किलोचा निर्व्यसनी पैलवान
108 किलोचा सहा फूट उंचीचा शिवदत पाटील हा पैलवानकी करत होता. नुकतेच त्याने खेबवडे (ता.करवीर) येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत मैदान मारले होते. याबद्दल गावात त्याचा सत्कार झाला होता. तो स्वतः निर्व्यसनी होता. वडील कीर्तनकार असल्याकारणाने त्याच्यावर धार्मिक पगडा होता.
कला विषयात त्यांने पदवीचे शिक्षण घेतले होते.
तो संतांचा गाडा अभ्यासक होता. स्वतः निर्व्यसनी
असल्याकारणाने तरुणांच्यामध्ये प्रबोधन करत होता. प्रबोधन कार्यक्रमात सहभागी होत होता. गावात तालीम नसल्याकारणाने निगवे खालसा (ता. करवीर) येथे तो सरावासाठी तालमीत जात होता. सर्वांच्या मध्ये लोकप्रिय असलेल्या शिवदत पाटलाच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.