
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी निवडणूक
कोल्हापूर आवाज इंडिया
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी 2009 साली पंधरा टक्के कर्जाचा व्याजदर होता. तो आज साडेनऊ टक्के करण्यात आला आहे. सभासदांचा आमच्यावर विश्वास असून महालक्ष्मी सत्ताधारी सहकार आघाडीच्या विमान चिन्हावर शिक्का मारून आम्ही विजयी होणार असा विश्वास संस्थेचे माजी अध्यक्ष एम. आर. पाटील यांनी व्यक्त केला.
ते आजरा, चंदगड, गडहिंग्लज या ठिकाणी प्रचार प्रसंगी बोलत होते. यावेळी सुकाणू समितीचे माजी अध्यक्ष व्ही. पी. साबळे, सहाय्यक लेखा अधिकारी माजी अध्यक्ष महावीर सोळांकुरे, विद्यमान अध्यक्ष राजू परीट, विद्यमान संचालक रणजीत उर्फ बंडा पाटील, शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, माजी उपाध्यक्ष शांताराम माने, सुकाणू समितीचे माजी
अध्यक्ष एम. एम.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेची सुसज्ज इमारत, सभासदांच्यासाठी सांस्कृतिक कार्यालय, या सत्ताधारी पॅनलच्या जमेच्या बाजू आहेत.
सभासदांना 35 लाखांच्या पर्यंत कर्ज मर्यादा 40 मिनिटात उपलब्ध करून दिले जाते, तात्काळ कर्ज पन्नास हजार पर्यंत दिले जात, संस्थेच्या पारदर्शकतेसाठी संस्थेने आपल्या नावाचे ॲप लॉन्च केले आहे.त्यामध्ये सभासदांचे शेअर्स वर्गणी ठेवी, इतर वर्गणी ठेव यांची माहिती घरबसल्या सभासदांना मिळते, कर्जदार व जामीनदार यांची रक्कम घरबसल्या सभासदांना मिळते, संस्थेच्या सेविंग खात्यावरून 50 हजार पर्यंत सभासदांना दिवसा व्यवहार करता येतो, या संस्थेच्या जमेच्या बाजू असल्याकारणाने सत्ताधारी यांचा विजय होणार असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
संस्थेच्या विरोधात चालू असलेली कर्मचारी भरतीची केस संस्थेने जिंकली असल्यामुळे व संस्थेचा होणारा खर्च वाचला आहे ही विरोधकांना चपराक आहे कारण विरोधकांमधील काही अपप्रवृत्तीच्या लोकांनीच कर्मचाऱ्यांनाही ही केस लढवायला प्रवृत्त केले होते असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
विरोधकांना मिळाले नाही उमेदवार
विरोधकांना उमेदवार न मिळाल्यामुळे शिक्षक गटातून दोन उमेदवार विजयी झाले असल्याने उर्वरित सर्व उमेदवार दोन तृतीय अंश बहुमताने विजयी होणार असा आत्मविश्वास मान्यवरांनी व्यक्त केला .