+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात प्रमुख नेत्याची लोकसभेच्या रिंगणातून माघार adjustदिल्लीच्या संसदेत कोल्हापूरचे शाहूच adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द
schedule21 Apr 23 person by visibility 158 categoryराजकीय
- माजी खासदार निवेदिता माने*
कोल्हापूर :

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार अमल महाडिक,माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, जवाहरचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी खासदार निवेदिता माने यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. लोकनेते स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यामधला अकृत्रिम जिव्हाळा आणि स्नेह दुसऱ्या-तिसऱ्या पिढीनेही जपल्याचे त्यांनी नमूद केले. राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत संपूर्ण माने परिवार आणि कार्यकर्ते सत्तारूढ सहकार आघाडीच्या पाठीशी असून या निवडणुकीत विक्रमी मताधिक्य रूकडी परिसरातून कपबशीला देऊ अशी ग्वाही माने यांनी दिली. खासदार धैर्यशील माने बाहेरगावी असल्यामुळे या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत पण शिरोली मधील सभेला ते नक्कीच उपस्थित राहतील असेही माने म्हणाल्या.
राजाराम कारखाना सभासदांच्या मालकीचा राहणं गरजेचं आहे आणि यासाठीच सत्तारूढ सहकार आघाडी पुन्हा विजयी होणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सहकार आघाडी नेहमीच प्रयत्नशील राहील याची खात्री आहे असा शब्दात माजी खासदार निवेदिता माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना माजी आमदार अमल महाडिक यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. माझ्या कारखान्याचा कारभार आरश्यासारखा स्वच्छ आहे. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पण तुम्हाला आजवर एकाही प्रश्नाचे उत्तर द्यायला जमलेले नाही. यावरूनच तुमची नैतिकता दिसून येते अशा शब्दात अमोल महाडिक यांनी विरोधकांना फटकारले.
राजाराम कारखान्याचे माजी तज्ञ संचालक शिवाजी घोरपडे यांनी माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांना चांगलेच फैलावर घेतले. आजवर रुकडी गावातील ज्यांचे मयत शेअर्स ट्रान्सफर झाले आहेत त्यांची यादीच घोरपडे यांनी वाचून दाखवली. सर्जेराव माने फुटबॉल आहेत अशी जहरी टीका घोरपडे यांनी केली. यावेळी रूकडी गावच्या सरपंच जयश्री रुकडीकर ,जवाहर कारखान्याचे संचालक जिनगोंडा पाटील, राजू मगदूम, अविनाश बनगे, सुरेश पाटील, प्रताप पाटील, अण्णासो डिग्रजे यांच्यासह विविध मान्यवर सभासद शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.