+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule24 Aug 22 person by visibility 191 categoryलाइफस्टाइल

असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी

मुंबई : सोनाली कुलकर्णीने आजपर्यंत विविधअंगी भूमिका साकारल्या आहेत.अलीकडेच तिचा 'तमाशा लाईव्ह 'चित्रपट बॉक्स ऑफिस वर येऊन गेला. सोनाली आता नव्या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. ती आता एका ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे. याआधी सोनालीने हिरकणी या ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारली होती. या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते .आता सोनाली कुलकर्णी ' मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी ' या ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे.

मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी हा प्लॅनेट मराठी ची निर्मिती असलेला चित्रपट आहे. प्लॅनेट मराठीने नुकतेच इंस्टाग्राम वर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ही माहिती दिली .औरंगजेब सारख्या स्वराज्यावर टपून बसलेल्या बलाढ्य मोगल दिल्लीपती पातशहाला महाराष्ट्राच्या मातीत कायमचा झोपवणाऱ्या 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी ' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न ! असं कॅप्शन देत पोस्टर शेअर करण्यात आला आहे.

मराठ्यांचा दैदिप्यमान संग्राम या चित्रपटातून पहावयास मिळणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीने छत्रपती ताराराणी यांची भूमिका केली आहे. चित्रपटाची खासियत म्हणजे मराठीतील आघाडीचे संगीतकार अवधूत गुप्ते यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी चित्रनगरीमध्ये भव्य सेट उभारला गेला आहे .हिरकणी चित्रपटातील भूमिकेसाठी सोनालीला अनेक पुरस्कार मिळाले होते. आता तिला परत एकदा ऐतिहासिक भूमिकेत पाहणे प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार आहे.