+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule12 Sep 22 person by visibility 351 categoryसामाजिक
कोल्हापूर : समर्थ सोशल फाउंडेशन , न्यूट्रीफील हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र व जनरल हॉस्पिटल यांच्या व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त अभियानामध्ये भाग घेऊन अनेक लोकांना व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त केल्याबद्दल, उत्कृष्ट काम केलेल्या संस्थेच्या केंद्रधारकांना "राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी समर्थ सोशल फाउंडेशनचे संस्थापक माननीय सादिक शेख व शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक माननीय सागर देसाई संस्थेचे संचालक असलम शेख , सुहास पाटील संस्थेचे सर्व विस्तार अधिकारी व सभासद उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय श्री. अतुल भि. आकुर्डे साहेब
सहाय्यक संचालक वित्त विभाग, मंत्रालय मुंबई .

सन्माननीय श्री विशाल जाधव,  युवा उद्योगपती शिव समर्थ असोसिएट्स चे मॅनेजिंग डायरेक्टर.

सन्माननीय श्री संदीप गडकर , मोटार वाहन निरीक्षक (RTO), कोल्हापूर.

वरील मान्यवरांच्या हस्ते खालील केंद्रधारकांना पुरस्कार प्रधान करण्यात आला.

पुरस्कार विजेते -
सौ. सोनाली आवडे

यावेळी संस्थापक  श्री .सादिक शेख  ह्यांनी समर्थ सोशल फौंडेशन व न्यूट्रीफील हेल्थ प्रो प्रा लि ह्या सामाजिक संस्थे विषयी संस्थेच्या अभियाना विषयी सविस्तर माहिती दिली.

निवासी केंद्राचे प्रमुख श्री. सागर देसाई ह्यांनी संस्थेच्या शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती मानसोपचार, व पुनर्वसन केंद्राची सविस्तर माहिती दिली, ह्यावेळी निवासी केंद्राच्या माद्यमातून व्यसन मुक्त झालेल्या व्यक्तींचा ही सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुण्यानी पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थिती लोकांना व्यसनमुक्ती कामा संदर्भात मार्गदर्शन केले.

ह्या भव्य सोहळ्याचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक श्री. अस्लम शेख ह्यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक श्री सुहास पाटील ह्यांनी केले.

ह्या कार्यक्रमास, प्रतिष्ठित मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, विस्तार अधिकारी,जनसंपर्क अधिकारी तसेच पुरस्कार विजेते व त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.