कोल्हापूर (आवाज इंडिया)
अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय ६० वे वार्षिक अधिवेशन शुक्रवारी (ता. १७), शनिवारी (ता. १८) अतिग्रे (हातकणंगले) येथे होणार आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित असतील. अधिवेशनाच्या स्वागताअध्यक्षपदी संजय घोडावत आहेत,अशी माहिती संमेलनाचे अध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
जगदाळे म्हणाले, या अधिवेशनाचे उदघाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी उपस्थित असणार आहेत.
जुनी पेन्शन योजना लागू करावी. खासगी कंपन्यांतर्फे भरती करू नये. विनाअनुदानित शाळांना विनाअट अनुदान मिळावे, आदी मागण्यांकडे सरकारचे या अधिवेशनातून लक्ष वेधले जाणार आहे. दत्तात्रय कदम म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच होणाऱ्या अधिवेशनाचे संयोजन पश्चिम महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने केले आहे. त्यासाठी राज्यभरातून सुमारे ५ हजार मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मनोहर पवार, विनोद पाटील, प्रकाश पाटील, गजानन काटकर, जर्नादन दिंडे, आनंदा वारंग, शिवाजी खापणे उपस्थित होते.