+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule14 May 24 person by visibility 128 category
*
कोल्हापूर, (जिमाका) : जिल्हा क्रीडा परिषद, कोल्हापूर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने दिनांक २१ ते ३० मे २०२४ दरम्यान उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी दिली आहे. 
छत्रपती शिवाजी स्टेडियम कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात खेळाडूंना कुस्ती, योगासन, जलतरण, हॉकी, मल्लखांब, जिम्नॅस्टिक, लाठीकाठी, तलवारबाजी, फुटबॉल, ज्युदो या क्रीडा प्रकारांचे मुलभूत कौशल्यांचे तंत्रशुध्द मार्गदर्शन अनुभवी व राष्ट्रीय दर्जाचे क्रीडा मार्गदर्शक व प्रशिक्षक यांच्याकडून दिले जाणार आहे. या शिबिराकरता ८ ते १४ वयोगटातील प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना प्रवेश देण्यात येईल. शिबीरामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थी खेळाडूंना अल्पोपहार व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या शिबीरामध्ये जास्तीत जास्त मुलामुलींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर येथील राज्य क्रीडा मार्गदर्शक रविभूषण कुमठेकर-८३७९०१३८४७, प्रवीण कोंढवळे -९८२३७९२८७९, यांच्याशी दि.१३ ते १६ मे २०२४ या कालावधीत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
००००