
कोल्हापूर आवाज इंडिया
नॅशनल ब्लॅक पॅथर पक्ष हा छ शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर याच्या विचार धारेवर चालणारा पक्ष आहे. पक्षाची नोंदणी दि २४ सप्टेंबर २०१४ रोजी भारत निर्वाचन आयोग, नवी दिल्ली व राज्य निवडणूक आयोग, मुंबई याच्या कडे केली आहे. त्यानिमित्त पक्षाचा ९ वा वर्धापन दिन, तसेच महात्मा ज्योतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना दि. २४ सप्टेंबर १८७३ रोजी केली होती. त्याला दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी १५० वर्ष पूर्ण होत आहेत. या दोन्ही कार्यक्रमाचे नियोजन रविवारी दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे दुपारी ठीक ३ वा केले आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी दिली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पद्मश्री लक्ष्मण माने ( जेष्ठ विचारवंत व साहित्यिक), प्रमुख पाहुणे संपत देसाई (कार्याध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल), कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शरद गायकवाड आहेत. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा आपल्या वाणी लेखणीच्या माध्यमातून प्रचार प्रसार करणारे मा. आ. ह. साळुंखे (जेष्ठ विचारवंत सातारा) यांना सत्यशोधक समाजरत्न जिवन गौरव पुरस्कार. तसेच मा नवनाथ शिंदे (आजरा), मा. मच्छिंद्र कांबळे (अध्यक्ष. बहुजन ऐक्य चळवळ ), मा. नितीन पाटील (संस्थापक अध्यक्ष, ब्रिलियंट इंग्लिश मेडियम स्कूल, नरंदे ) यांना सत्यशोधक समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यावेळी 'मी महात्मा फुले बोलतोय' हा एकपात्री प्रयोग होणार आहे.
गौतम करूणादित्य, आनंदजी कांबळे (राष्ट्रीय उपाध्यक्ष नॅशनल ब्लॅक पँथरपक्ष), बाळासाहेब कांबळे,संभाजी लोखंडे, अरुण लोखंडे,उमेश कांबळे, अशितोष पाटील उपस्थित होते.